मोरेकुरण गावात जागेच्या वादातुन तिघांनवर आत्मघातकी हल्ला !
मोरेकुरण गावात जागेच्या वादातुन तिघांनवर आत्मघातकी हल्ला !
मौजे मोरेकुरण गट क्रमांक 121 गुरचरण असलेल्या शासकीय जमिनीवर व पूर्वापार अस्तित्वात आणि वापरात असलेल्या राज्य महामार्ग क्रमांक चार (MSH4) चा भाग असलेल्या पालघर मोरेकुरण-दापोली या मुख्य रस्त्यावर बेकायदेशीर अतिक्रमण केले होते. त्यानंतर सदरील गट क्रमांक 121 चे अतिक्रमण तहसीलदार पालघर यांनी दिनांक 1 जून 2022 रोजी पोलीस बंदोबस्तात दूर केले. तसेच मुख्य रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) पालघर यांनी पूर्ण केले. परंतु अर्ज विनंत्या करुन शासनाला निदर्शनास आणून देण्याऱ्या वर राग धरून जयेन्द्र कमळाकर पिंपळे ,जयश्री जयेन्द्र पिंपळे आणि धनेश रघुनाथ पिंपळे यांना रस्त्यात घेरून राजेश दामोदर संखे, पंकज दामोदर संखे,ललित मोरश्वर संखे, अमित मोरश्वर संखे या चौघानी आत्मघातकी हल्ला केल्या प्रकरणी कलम 307, 326 ,324, 323, 504, 506, आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपी फरार आहेत.
पुढील तपास पालघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील करत आहेत.
Comments
Post a Comment