निकृष्ट दर्जाचा पुल देणार अपघाताला निमंत्रण
निकृष्ट दर्जाचा पुल देणार अपघाताला निमंत्रण
तारापुर :बोईसर तारापुर मुख्य रस्त्यावरील पास्थळ गावा च्या पुढे एक पुल आहे ज्याला बाणगंगा पुल या नावाने ओळखले जाते. परंतु नविन पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे आज पहिल्या पावसात खचला.
वाहतुकीसाठी जूना पुल अरूंद पडत असल्याने वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी नविन पुल उभारण्यात आला आहे. परंतु नोंदणीकृत ठेकेदार स्वतः काम न करता आपल्या संपर्कातील एखाद्याला कमी किंमतीत बांधकामांचे काम करुन घेत आहेत . यामुळे पावसाळा सुरू होताच हा पुल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे.
मिळालेल्या माहिती नुसार सदर पुल मिलन रोड बिलटेक कंपनी कडून बांधण्यास दिलेला असून हे काम मिलन रोड बिलटेक कंपनी कडून न करता सब कॉन्ट्रैक्टर कडून बांधण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
परंतु हे काम इतके निकृष्ट दर्जाचे आहे की महिन्या पूर्वीच वाहतुकीसाठी खुला केलेला बाणगंगा पुल पहिल्या पावसात खचला आहे.त्यामुळे लोकांनी ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागावार नाराजी व्यक्त करत सदर कामाची उच्चस्तरीय समिती गठीत करून संपूर्ण कामाची चौकशी करण्यात यावी असे ग्रामस्थांमधून बोललं जात आहे.
Comments
Post a Comment