बोइसर परिसरात दिवसागणित गुन्हेगारी वाढली
बोइसर परिसरात दिवसागणित गुन्हेगारी वाढली
मैनेजर ला कट रचुन मारण्याचा प्रयत्न
क्राइम अलर्ट : स्वप्निल पिंपले
पालघर :बोईसर तारापूर रस्त्यावरील कुरगाव येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीला सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास तीन अज्ञात इसमांनी रस्त्याच्या बाजूला बोलावून धारदार शस्त्राने पाय तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहेे. बोईसर तारापूर रस्त्यावरील जानकी पार्क, गोकुळ नगर येथील रहिवाशी असलेल्या देवेंद्र भंगाळे (वय 38) हे एनजीएल फाईन केम लिमिटेड तारापूर मध्ये क्वालिटी मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. ते ३० मे रोजी सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आपल्या गाडीने कामावर निघाले असता, काही अंतरावर एका मास्क घातलेल्या इसमाने त्यांना थाबवले. आणि माझ्या भावाला सापाने दंश केला तो शेतात आहे. मला मदत करा असे बोलून भंगाळे यांना रस्त्याचा बाजूला २०० ते ३०० मीटर अंतरावर घेऊन गेला.
त्याठिकाणी आधीच दबा धरून बसलेल्या इतर दोघांनी भंगाळे यांच्या लक्षात यायच्या अगोदरच पकडले. एकाने हात पकडले आणि एकाने धारदार शस्त्राने भंगाळे यांच्या उजव्या पायावर सपासप वार केले आणि पाय तोडला. त्यानंतर हात तोडण्यासाठी मारेकरी एकमेकांना बोलत होते. अशा परिस्थितीत भंगाळे यांनी हिम्मत करून मारेकरी यांच्या हातातून ते धारदार शस्त्र खेचण्याचा प्रयत्न केला. आणि तो सुरा भंगाळे यांचा हाताला लागला. ते बघून मारेकरी पसार झाले. भंगाळे यांना बोईसर येथील आनंद हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांचा उजव्या पायावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता त्यांची प्रकृती ठीक आहे.परंतु यामुळे परिसरात भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे.अज्ञात तिन्ही इसमांनी तोंडावर मास्क लावले असल्याचे भंगाळे यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांची ओळख पटली नसल्याचे पोलीस निरीक्षक योगेश जाधव यांनी सांगितले. व अनोळखी चार इसमावर कलम 326 व 34 लावुन पुढील प्रकाराची चौकशी सुरु असल्याचे सांगितले आहे.
Comments
Post a Comment