बोईसर मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची चिन्हे
बोईसर मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची चिन्हे बोईसर : राज्याची विधानसभा निवडणूक येत्या 20 नोव्हेंबरला होणार आहे. या निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती विधानसभा निवडणुकीत आमनेसामने येणार आहेत. बड्या नेत्यांसह इतर उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केले आहेत. यात बोईसर विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीने आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी देत बोईसर विधानसभेचा गड कायम राखण्यासाठी प्रयत्न केले आहे. शिवसेना पक्षाकडून विलास तरे यांना रिंगणात उतरवले आहे तर मविआकडून डॉ. विश्वास वळवी यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळें तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. बोईसर विधानसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षापासून बहुजन विकास आघाडीचा वर्चस्व राहिला आहे. २००९ साली बोईसर विधानसभा गट निर्माण होऊन बहुजन विकास आघाडीकडून संधी मिळालेल्या विलास तरे यांनी झेंडा फडकवला होता. २०१४ साली देखील विलास तरेच विजयी झाले होते. मात्र २०१९ साली विलास तरे यांनी शिवसेनेत प्रवेश करत निवडणूक लढवली होती. परंतु युती धर्म न पाळल्यामुळे बंडखोर उमेदवारांन...