पालघर पोलिसांची उत्तम कामगिरी ; दोन घरफोडी व एक फसवणुक अश्या तीन गुन्ह्याचे प्रकरण केले उघड

पालघर पोलिसांची उत्तम कामगिरी ; दोन घरफोडी व एक फसवणुक अश्या तीन गुन्ह्याचे प्रकरण केले उघड


पालघर :  पालघर पोलिसांनी नालासोपारा, पालघर येथील घरफोडी व सफाळे येथील सुमारे दीड वर्षापासून अपहार व फसवणुकीच्या गुन्ह्यात नजरेआड झालेला आरोपी अश्या
विविध तीन गुन्ह्याची उकल करून आरोपीना अटक करण्यात पोलिसाना यश आले आहेत.

पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील तसेच अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी तपास पथक तयार करून तपासाबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथकाने विविध तीन प्रकरणाची उघड आज केली आहे.

पालघर  येथील शोएब अकबर शेख महावीर निधी रूम नंबर २०६ साई रेसिडेन्सी यांच्या बंद घरातून २१ हजार रुपये किमतीचे ६.२८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण चोरी झाल्याची फिर्यादीवरून पालघर पोलीस ठाणे येथे गु. र. नं १९३/२०२४ भा. ना सं २०२३ कलम ३०५(अ), ३३१(३) प्रमाणे दि२४/०९/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्या अनुषंगाने पो निरीक्षक प्रदीप पाटील यांनी विविध ठिकाणी सापळा रचून रबाळे, नवी मुंबई, कासाखडकवली, दानीदमण पोलीस ठाण्यात एकूण १७ गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार शफिक अब्दुल शेख उर्फ टोपी वय ४६वर्ष रा. भिवंडी यास दि ४/१०/२०२४ रोजी जूचंद्र वसई येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली आहे.


तसेच नालासोपारा येथील इन्स्टाकार्ट सर्विसेस प्रा लि या कार्यालयाची स्लाइडिंगची खिडकी उचकटून त्यातून   वेगवेगळ्या कंपनीचे २० मोबाईल हँडसेट, पॉवर बँक , वाईट स्टोन परफ्युम अशा एकूण ५ लाख १६ हजार ३५ रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या बिरवाडी येथील आकाश जितेंद्र ठाकूर वय २६ वर्ष याला दिनांक २ ऑक्टोबर २०२४ रोजी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता सदरचा गुणाची कबुली दिलेली आहे. त्याच्या विरोधात पालघर पोलिस ठाण्यात गु. र. नं १९७/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३३१(४), ३०५(अ) प्रमाणे दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


पालघर पोलिसांची धुरा सांभाळणारे बाळासाहेब पाटील यावर समाधान न मानता त्यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पो नि प्रदीप पाटील यांनी सफाळे येथे गणेश ज्वेलर्स या नावाने सोन्या चांदीचे दागिने तयार करणारे भागिदार व्यापारी १) कानाराम दलाराम चौधरी वय ४४ वर्ष राजस्थान २)  हितेश शांतीलाल ढोलकीया वसई  मुळ गाव गुजरात यांनी नवीन दागिने व जुने दागिने तयार करून देण्यासाठी व त्यांच्याकडून घेतलेली एकूण रक्कम १ कोटी ३८ लाख १८ हजार रूपये किंमतीत गिऱ्हाईकांची अपहार करून फसवणूक करत होते त्या अनुषंगाने दि १० मे २०२३ रोजी सफाळे पोलीस ठाण्यात गु.र.नं ४६/२०२३ भादंविसं कलम ४०६, ४०९, ४२०, व ३४ प्रमाणे गुन्हा नोंद असून दि १२ मे २०२३ रोजी हितेश शांतीलाल ढोलकीया यास अटक करण्यात आली होती तर सुमारे दीड वर्षापासून फरार असलेला आरोपी कानावर दलाराम चौधरी यास मध्यप्रदेश राज्यातील इंदौर येथून दि २० सप्टेंबर २०२४ अटक करण्यात यश मिळविले असून ७९ तक्रारदारांपैकी आतापर्यंत ३९ तक्रारदारांचा १७ लाख ७१ हजार १८३ किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात यश मिळालेले असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील करत असल्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी