एकाच्या मुसक्या आवळून एक पिस्तुल , पाच काडतुसे जप्त ; पालघर पोलीसांची कारवाई
एकाच्या मुसक्या आवळून एक पिस्तुल , पाच काडतुसे जप्त ; पालघर पोलीसांची कारवाई
पालघर : पालघर जिल्ह्यातील पोलिसांनी विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला अटक करून एक बोअर बंदुक, पाच
रिकामे काडतुसासह दहा हजारचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आगामी सार्वत्रीक विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने पालघर जिल्हयात अवैध धंदे व विनापरवाना अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाईची मोहीम सुरु करण्यात आलेली असताना कासा पोलीस ठाणे हद्दितील मौजे दाभाडी बोरपाडा येथील एका इसमाकडे विनापरवाना अग्निशस्त्र असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. सदर माहितीच्या अनुषंगाने (दि.२३) रोजी नमुद ठिकाणी छापा टाकला असता आरोपी नावजी जान्या हाडळ, वय ६५ वर्षे, रा. दाभाडी बोरपाडा ता. डहाण याला ताब्यात घेउन १) एक १२ बोअर बंदुक २) ३ जिवंत काडतुसे, ३) ५ रिकामे काडतुसे, ४) सुमारे ३०० ग्रॅम शिसा धातुचे लहान-मोठे तुकडे असा एकुण १०,७५०/- रु. किमंतीचे घातक शस्त्रे विनापरवाना जवळ बाळगुन मिळुन आल्याने नावजी जान्या हाडळ त्याला ताब्यात घेवुन, त्याच्या ताब्यातील घातक हत्यारे जप्त करण्यात आली असुन त्याच्याविरुद्ध कासा पोलीस ठाणे गु.र.नं. १७९/२०२४ भारतीय हत्यार अधिनियम कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक विलास कोथे नेम. कासा पो. ठाणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक पालघर, गणपत पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पोनि/प्रदिप पाटील, सपोनि/अनिल व्हटकर, पोउनि/रोहीत खोत, पोउनि/स्वप्नील सावंतदेसाई, पोहवा/दिलीप जनाठे, पोहवा/संतोष निकोळे, सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी केलेली आहे.
Comments
Post a Comment