श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी न देण्यात आल्यामुळे आत्महत्येच्या विचारात
श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी न देण्यात आल्यामुळे आत्महत्येच्या विचारात
पालघर : पालघर विधानसभेसाठी श्रीनिवास वनगा यांच्या ऐवजी माजी खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे श्रीनिवास वनगा हे पूर्णपणे मानसिक दृष्ट्या खचले असून आत्महत्या करण्याचा विचार करत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बंडा मध्ये सहभागी असलेल्या 39 आमदारांना उमेदवारी देण्यात आली मात्र यामध्ये पालघर चे आमदार श्रीनिवास वनगा हे एकमेव उमेदवारी न मिळालेले आमदार असून ज्या श्रीनिवास वनगा यांच्या मुलाच्या वाढदिवसाचे कारण दाखवून एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्याच आमदाराला वगळल्याने श्रीनिवास वनगा हे मोठ्या प्रमाणात नाराज असून त्यांनी कालपासून अन्न पाणी सोडून दिलं असून ते पूर्णपणे मानसिक दृष्ट्या खचले असून आत्महत्या करण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणात भीती पसरली आहे. उद्धव ठाकरे साहेब आमच्यासाठी देव होते परंतु एकनाथ शिंदे यांनी आमचा घात केला असं त्यांच्या कुटुंबियांनी माध्यमांसमोर सांगितलं. त्यामुळे त्यांचे कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणात भीती पसरली असून जर का श्रीनिवास वनगा यांचा बरा वाईट झालं तर आम्ही कुणाला जबाबदार धरायचं असा सवाल त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.
Comments
Post a Comment