ईपीएस-९५ पेन्शनधारकांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर जोरदार निदर्शने

ईपीएस-९५ पेन्शनधारकांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर जोरदार निदर्शने 


पालघर : ईपीएस-९५ पेन्शनधारक हा देशातील सर्वाधिक उपेक्षित ज्येष्ठ नागरिक आहे . पाचशे ते अडीच हजार इतके अत्यल्प पेन्शन गेली तीस वर्षे तो स्विकारत आहे. आजच्या महागाईच्या दिवसात पती-पत्नीचे आयुष्य कंठणे अशक्य आहे . यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालया समोरही जिल्ह्यातील पेन्शनधारकांनी जोरदार निदर्शने करुन जिल्हाधिकाऱ्या मार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर करण्यात आले.

 पाच वर्षे सातत्याने पाठपुरावा केल्यावर मनमोहन सिंगांच्या सरकारने किमान कोशियारी समिती नेमण्याची संवेदनशिलता दाखवली होती. मात्र समितीच्या अहवालाची अंमलबजावणी होण्याआधी त्यांचे सरकार गेले व शंभर दिवसात संपूर्ण अंमलबजावणीचे आश्वासन दिलेले मोदी सरकार सत्तेवर आले. सत्तेवर येताच शंभर दिवसांचे आत कोशियारी समिती अहवालाप्रमाणे पेन्शनवाढ करु असे आश्वासन देऊन सत्तेवर असतांना दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला देशभरातील ईपीएस-९५ पेन्शनधारकांनी निदर्शने करुन साकडे घातले आहे.

       

यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल ताहाराबादकर , सरचिटणिस प्रदीप पाटील, कार्याध्यक्ष अशोक राऊत, खजिनदार रविंद्र कदम, संघटक सचिव हेमंत पाटील, उपाध्यक्ष भगवान सांबरे आदि मान्यवरांनी पेन्शनधारकांच्या व्यथा मांडल्या. आंदोलनाची दखल दोन महीन्यात न घेतल्यास दिल्लीत "करो या मरो" पध्दतीने आंदोलन करण्याचा ईशाराही देण्यात आला.

       सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी बाळा पेडणेकर, जयप्रकाश झवेर, दत्ता पाटील, विलास जाधव, टी.के.पाटील, अनंंत कुडू, रमेश पाटील, विलास ठाकूर, शांताराम पाटील,आर.डी.पाटील,,रमेश ठाकूर, शैलेंन्द्र राणा, शांताराम भुसारा, सुभाष मोरे, रविंद्र आजगावकर, सुभाष घरत, रविंद्र चाफेकर, राजू घरत, दस्तगिर शेख आदि  वेगवेगळ्या क्षेत्रातील नेत्यांनी परिश्रम केले.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी