नागझरीत दगडाच्या खाणीत पडुन ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू
नागझरीत दगडाच्या खाणीत पडुन ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू
पालघर : पालघर तालुक्यातील नागझरी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व ठेकेदार जयेश मोहन काकड (वय ३२) रा. काकडपाडा (नागझरी) याचा एका दगड खाणीत उंचावरून पडून जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवार) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली आहे.
बोईसर पूर्वेकडील भाग हा दगड खाणीसाठी प्रसिद्ध असुन नागझरी ग्रामपंचायत हद्दीत एका दगड खाणीत जयेश मोहन काकड हा नेहमीप्रमाणे खदानीच्यावर मातीचा ढीगारा काढण्याचे काम करत होता. दरम्यान त्याचा तोल जाऊन तो ७० ते ८० फुटांवरून दगड खाणीत खाली कोसळला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला नागझरी येथील अधिकारी लाईफ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. त्यांनतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मनोर येथे पाठवण्यात आला आहे. या घटनेची मनोर पोलिसांनी नोंद करुन घेत अधिक तपास सुरू केला आहे. दरम्यान, दगडखाणींवर काम करणाऱ्या कामगारांना दगडखाण मालक अथवा चालकाकडून आवश्यक साधने पुरवली जात नसल्यानेच अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे येथील कामगारांचे म्हणणे आहे.
Comments
Post a Comment