रिलायन्स टेक्स्टाईल पार्कच्या विरोधात माहीम ग्रामपंचायतीचा ८ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

रिलायन्स टेक्स्टाईल पार्कच्या विरोधात माहीम ग्रामपंचायतीचा ८ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा


पालघर : पालघर तालुक्यातील रिलायन्स कंपनीसाठी देण्यात येणाऱ्या माहीम टोकराळे येथे ८०० एकर वर रिलायन्सच्या टेक्सटाईल पार्कच्या विरोधात माहीम ग्रामपंचायतीने व ग्रामस्थांनी विरोध करत या टेक्स्टाईल पार्कच्या विरोधात जनआंदोलन उभारून ८ ऑक्टोंबर रोजी शासन, प्रशासन व रिलायन्सच्या टेक्सटाईल पार्कच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय माहीम ग्रामपंचायतीने घेतला आहे.


पालघर तालुक्यातील माहीम टोकराळे येथील महसूल विभागाच्या ताब्यातील ८०० एकर जमिनीवर रिलायन्स चा टेक्स्टाईल पार्कचा प्रकल्प उभारणीच्या हालचाली चालू असून या प्रकल्पास विरोध दर्शविण्यासाठी आज माहीमच्या सरपंच प्रीती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली यावेळी माहीम विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन विवेकानंद ठाकूर कृष्णदत्त पाटील आदिवासी एकता परिषदेचे दत्ताराम करबट सर्व माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि केळव्यातील विविध संस्थेचे पदाधिकारी आणि  प्रतिष्ठित नागरिक व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

रिलायन्स कंपनीने मागणी केलेल्या माहीम येथील सर्वे नंबर ८३५ मधील  ६२.९८ व सर्वे नंबर ८३६ मधील ११७.८३ या जागे साठी माहीम मधील नागरिकांनी बहुउद्देशीय सामुदायिक शेती संस्थेच्या माध्यमातून शासनाकडे जमिनीची मागणी केली होती व यास मंजुरी मिळाली होती सद्यस्थितीत हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे याच ठिकाणी शासनाने ओएनजीसी चा बॉटलिंग प्रकल्प आणण्याचाही प्रयत्न केला होता मात्र नागरिकांच्या तीव्र विरोध लक्षात घेता हा प्रकल्प रद्द करण्यात आला होता सद्यस्थितीत येऊ घातलेल्या रिलायन्स टेक्सटाईल हा  महाविनाश कारक प्रकल्पाने ह्याच जागेची मागणी केली असून या प्रकल्पातून करोडो लीटर सांडपाणी खाडीच्या माध्यमातून समुद्रात सोडण्यात येणार असल्याने मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण तसेच वायू प्रदूषण होणार असल्याने निसर्ग समृद्ध केळवे माहिमचा परिसर बेचिराख होण्याची भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.


या प्रकल्पात पेट्रोलियमच्या माध्यमातून धाग्याची निर्मिती करण्यात येणार असून आधीच माहीम बिडको येथील कंपनीमुळे माहीमचा परिसर प्रदूषित झाला असून या महाकाय प्रकल्पामुळे परिसरातील प्रदूषण अतिउच्च पातळीवर जावून परिसराची मोठी हानी होईल असे ही मत यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केले.  पालघर जिल्ह्यात येऊ घातलेल्या मोठ्या प्रमाणात विकास प्रकल्पामुळे नागरिकांचे विस्थापन होणार असून कोस्टल रोड, बुलेट ट्रेन ,वाढवण बंदर ,मुर्बे जेटी व इतर प्रकल्पातून विस्थापित होणाऱ्या तसेच परिसरातील भूमिहीन लोकांना ही जमीन देण्यात यावी अशी मागणी या सभेत करण्यात आली. तसेच जिल्हाधिकरी कार्यालयातून माहीम मधील प्रकल्प जागेची मोजणी करताना ग्रामपंचायत व लगतचे कब्जेदार यांना विश्वासात न घेतल्याने महसूल विभागाचे अधिकारी व तलाठी यांना नागरिकांनी धारेवर घेतले.

 

केळवे माहीम परिसर हा निसर्ग सुंदर परिसर असल्याने या ठिकाणी पर्यटनाला मोठा वाव आहे केंद्र शासनाने गुजरात पासून गोव्यापर्यंत संपूर्ण किनारपट्टीवर जाहीर केलेल्या १३  टुरिझम ग्रोथ सेंटर मध्ये केळवे माहीम या विभागाचा समावेश असताना शासनाने हा पर्यावरण विनाशक प्रकल्प आणलाच कसा असा जाब  उपस्थित नागरिकांनी प्रशासनाला विचारला .

रिलायन्स टेक्सटाईल पार्क या प्रकल्पास विरोध करण्यासाठी केळवे ,माहीम, केळवे रोड तसेच ७ परिसरात मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली असून आचारसंहिता लागण्याच्या आत मंत्रिमंडळाने हा निर्णय कायम होण्याच्या आधी प्रशासकीय पातळीवर, राजकीय पातळीवर, तसेच न्यायालयीन पातळीवर या प्रकल्पा विरोधात तीव्र विरोधी भूमिका घेण्याचे ठरले आहे यासाठी सध्या सत्तेत असलेल्या पक्षाच्या पदाधिकारी नेत्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या भावना  राजकारण्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत तर विरोधी पक्षांना पण या चळवळीत सहभागी करून प्रकल्पास विरोधासाठी मदत केली तरच निवडणुकीत मदत करू असा भूमिका घेण्यात आली या प्रकल्पास विरोधासाठी

दिशा ठरविण्यासाठी रविवारी परिसरातील सर्व ग्रामपंचायत , संस्थांचे प्रतिनिधी, ग्रामस्थ यांची सभा बोलाविण्यात आली आहे.


Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी