भीमनगर येथील बेकायदेशीर बांधकाम, ग्रामपंचायतीकडून नोटीस बजावली तरी बांधकाम सुरु
भीमनगर येथील बेकायदेशीर बांधकाम, ग्रामपंचायती कडून नोटीस बजावली तरी बांधकाम सुरु
बोईसर : बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील भीमनगर गावात शहिद खान यांच्या बेकायदेशीर बांधकामाला ग्रामपंचायती कडून नोटिस बजावून देखील संबंधितांकडून प्रतिसाद न देता बेकायदेशीर बांधकाम सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
बोईसर शहरात अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढतच चालले असून त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. अश्यातच बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील भीमनगर गावात शहिद खान यांच्या बेकायदेशीर बांधकामाची लेखी तक्रार नयन पाटील यांनी केल्यानंतर बोईसर ग्रामपंचायती कडून बांधकामाचे कागदपत्रे सात दिवसांत सादर करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती.
सदर बांधकाम हे नविन शर्तीच्या जागेत सुरू असून बोगस नोटरीच्या आधारावर खरेदी केलेल्या जागेत तळ मजल्यावर वाणिज्य वापरासाठी दोन गाळे असून पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर रहिवास प्रयोजनार्थ बांधकाम केलेले आहे. सदर जमीन शेतीसाठी वाटप करण्यात आलेली असून शासनाची कुठलीच परवानगी न घेता बेकायदेशीर बांधकाम सुरू असताना ग्रामपंचायतीकडून दिलेली नोटीस केराच्या टोपलीत टाकून शहिद खान महसूल विभागाला देखील न जुमानता आपले बेकायदेशीर बांधकाम जोमात सुरू ठेवले आहे.
Comments
Post a Comment