अवैध दारुसाठा बाळगल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची धोडीवर कारवाई
अवैध दारुसाठा बाळगल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची धोडीवर कारवाई
पालघर : आगामी सार्वत्रीक विधानसभा निवडणुक २०२४ चे अनुषंगाने दिनांक १५/१०/२०२४ रोजी पासून संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे, त्याअनुषंगाने बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना पालघर जिल्हयात चालणारे अवैध धंदे, विनापरवाना अग्नीशस्त्र बाळगणारे इसम यांचेविरुध्द कारवाई करण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत.
त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी अवैध दारूसाठा बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून दिनांक २४/१०/२०२४ रोजी रात्री ११.०० वाजण्याच्या सुमारास घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील आरोपी शशांक अशोक धोडी वय ३२ वर्षे, रा. वेवजी नानापाडा ता. तलासरी जि. पालघर ह्याच्या राहते घराच्या पाठिमागील शेडमध्ये एकूण २७,१९,६८०/- रूपये किमतीची महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधीत असलेली दारू साठा करून बाळगली असताना मिळून आल्याने आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील खालीलप्रमाणे अवैध दारूचा साठा जप्त केलेला आहे.
१) १२,१२,९६० /- रुपये किमतीची रॉयल स्टेकक्लासिक एकूण १३३ बॉक्स.
२)१,२४,८०० /- रुपये किमतीची मॅजिक मोव्हमेटस ग्रीन ॲपल एकूण १३ बॉक्स.
३) १,४४,००० /- रुपये किमतीची मॅजिक मोव्हमेटस ग्रीन ॲपल फ्लेवर वोडका एकुण १५ बॉक्स.
४) ८३,५२०/-किमतीची ओल्ड मंकडिलक्स रम ट्रिपल एकुण १२ बॉक्स एका बॉक्स.
५)६,५५,२००/- किमतीची रॉयल स्टेक कंपनीचे एकुण ७० बॉक्स.
६) ४,६८,४८० /- रु इंम्पेरियल ब्लु कंपनीची हॅन्ड पिक व्हिस्की एकूण ६१ बॉक्स.
७)३०,७२० /- रु इंम्पेरियल ब्लु कंपनीची हॅन्ड पिक व्हिस्की एकुण ०४ बॉक्स.
असा एकूण २७,१९,६८०/- रुपये किंमतीची एकूण २६९२.८ लिटर मुद्देमाल जप्त केलेला आहे.
सदर बाबत घोलवड पोलीस ठाणे गुरनं १४७/२०२४ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा तपास पोउपनि/परमेश्वर जाधव, नेमणुक घोलवड पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई बाळासाहेच पाटील, पोलीस अधीक्षक पालघर, चिनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक पालघर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे अनिल लाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणु विभाग, पोनि/प्रदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पालघर, सपोनि/गजानन पडळकर, प्रभारी अधिकारी घोलवड पोलीस ठाणे, श्रेपोउपनि/सुनिल नलावडे, पोहया/संदिप सुर्यवंशी, पोहवा/नरेंद्र पाटील, पोहवा/कैलास पाटील, पोहवा/दिनेश पाटील, पोहवा/दिपक राऊत, पोहवा/राकेश पाटील, पोअं/विशाल नांगरे सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी उत्कृष्टरित्या पार पाडलेली आहे.
Comments
Post a Comment