बोईसर मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची चिन्हे

बोईसर मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची चिन्हे 


बोईसर : राज्याची विधानसभा निवडणूक येत्या 20 नोव्हेंबरला होणार आहे. या निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती विधानसभा निवडणुकीत आमनेसामने येणार आहेत. बड्या नेत्यांसह इतर उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केले आहेत.

यात बोईसर विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीने आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी देत बोईसर विधानसभेचा गड कायम राखण्यासाठी प्रयत्न केले आहे.  शिवसेना पक्षाकडून विलास तरे यांना रिंगणात उतरवले आहे 

तर मविआकडून डॉ. विश्वास वळवी यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळें तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.


बोईसर विधानसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षापासून बहुजन विकास आघाडीचा वर्चस्व राहिला आहे. २००९ साली बोईसर विधानसभा गट निर्माण होऊन बहुजन विकास आघाडीकडून संधी मिळालेल्या विलास तरे यांनी झेंडा फडकवला होता. २०१४ साली देखील विलास तरेच विजयी झाले होते. मात्र २०१९ साली विलास तरे यांनी शिवसेनेत प्रवेश करत निवडणूक लढवली होती. परंतु युती धर्म न पाळल्यामुळे बंडखोर उमेदवारांनी तरे यांची मत खाऊन  बविआचे राजेश पाटील यांना अवघ्या काही मतांनी विजयी होण्यास मार्ग सुकर केला होता. शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतर विलास तरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, पालघर व बोईसर विधानसभेची जागा ही शिवसेना  गटाला गेल्याने बोईसर विधासभेकरता विलास तरे यांना उमेदवारी जाहीर करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला शिवसेना पक्षा कडून अधिकृत उमेदवार म्हणून विलास तरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर बविआने राजेश पाटील यांना पुन्हा मैदानात उतरविल्याने पाटील आणि तरे यांच्यात पुन्हा एकदा चुरशीची लडत बघावयास  मिळणार आहे . 

तर नंदुरबार येथील परंतु ठाणे येथे वास्तव्यात असलेले डॉ.विश्वास वळवी यांनी पालघर बहुल आदिवासी जिल्ह्यांत विविध उपक्रम राबवत अगदी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर  शिंदेच्या शिवसेनेला रामराम ठोकत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत बोईसर विधानसभेतून उमेदवारी मिळविण्यात यशस्वी झालेले असून महायुतीचा फॉर्मुला वापरत कॉंग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातून इच्छुक असलेले स्थानिक उमेदवारांना ठाकरे गटात प्रवेश देऊन उमेदवारी दिली असती तर स्थानिक व उपरे यांच्यातील वाद थंडावला असता व त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला असता परंतु वळवी यांना उमेदवारी दिल्यामुळे मविआतील अनेकांकडून नाराजीचा सूर निघत असून त्याचा फायदा सर्वांच्या जवळील असलेले महायुतीचे उमेदवार विलास तरे यांना नक्कीच होणार असल्याचे समजते.


"महायुतीची असलेली मजबुती व मतदार राजाचे माझ्यावर असलेले प्रेम हीच माझ्या विजयाची पोच पावती".


विलास तरे - महायुती उमेदवार बोईसर विधानसभा

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी