बोईसर ग्रामपंचायतीकडून विविध ठिकाणी सेल्फी पॉइंटचे उद्घाटन......
बोईसर ग्रामपंचायतीकडून विविध ठिकाणी सेल्फी पॉइंटचे उद्घाटन......
बोईसर : पालघर तालुक्यातील बोईसर ग्रामपंचायतीकडून विविध ठिकाणी सेल्फी पॉईंट विकासकामांचे उद्घाटन १५ ऑक्टोबर २०२४ रोजी सर्व पक्षीय नेते मंडळींच्या उपस्थितीतीत मोठ्या थाटामाटात करण्यात आले. २८ ऑक्टोबर २०२२ रोजी नव्याने निवडून आलेले बोईसर ग्रामपंचायतीचे सरपंच दिलीप धोडी , उपसरपंच निलम संखे व सर्वच सदस्यांचा सहकार्याने बोईसर ग्रामपंचायत क्षेत्रातील गटार, रस्ते अशा विविध विकासकामांसाठी केंद्र शासनाचा पंधरा वित्तीय निधीतून १ कोटी पन्नास लाख रुपये तर ग्रामपंचायत स्वनिधी फंडातून दोन कोटी रूपयांचे विविध विकासकामाची सुरवात करून काही कामे पूर्ण झाल्याची दिसत आहे.
१५ ऑक्टोबर रोजी बोईसर वार्ड, सिडकोवार्ड भिमनगर वार्ड ,काटकरपाडा वार्ड, वंजारवाडा वार्ड व दांडीपाडा वार्ड यामध्ये १५ वित्त आयोग मधून २.५ कोटी व ग्रामनिधी मधून २.५ कोटी,पेसा मधून ५० लाख असे एकूण ५.५० कोटी निधी असून त्या निधीच्या अनुषंगाने आज विविध कामांचे बोईसर ग्रामपंचायती कडून भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी सरपंच दिलीप धोडी, उपसरपंच निलम संखे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र भोणे, पंचायत समिती सदस्य अजय दिवे, पंचायत समिती सदस्य सलोनी वडे, ग्रा वि कमलेश संखे, ग्रा पं सदस्या उषा जाधव, सदस्य दशरथ सुतार, सदस्य रणजित खरात, सदस्य अजय ठाकूर, अशोक वडे, संतोष मराठे, चंद्रकांत जाधव, सुरेश जाधव, सुभाष पंडित, जगदीश चौधरी, राजू जाधव, भुजंग शेट्टी, अविनाश चुरी, अतुल देसाई व पत्रकार उपस्थित होते.
दोन वर्षात अनेक विकास कामावर भर दिलेला असून नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या कचरा हि समस्या खूप त्रासदायक असताना ज्या ठिकाणी कचरा फेकला जातो असे जंक्शन ठिकाणे सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. :- निलम संखे - उपसरपंच ग्रा पं बोईसर
बोईसरच्या भीमनगर गावात बौद्ध समाज मंदिरा जवळच कचरा फेकून मोठी समस्या निर्माण झाली होती. सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या निदर्शनास हि बाब आणून दिल्यानंतर तात्काळ त्याठिकाणी एका सेल्फी पॉइंटचे बांधकाम करून नागरिकांना बसण्यासाठी एक सुसज्ज अशी बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. मी बोईसर ग्रामपंचायतीचे मनापासून आभार व्यक्त करत आहे :- उषा चंद्रकांत जाधव - सदस्या ग्रा पं बोईसर
विकास कामे तसेच गाव सुशोभीकरण करताना रस्त्यावरील पथदिव्याकडे देखील लक्ष देणे गरजेचे असून मुख्य रस्त्यालगत फेरिवाल्यांची संख्या वाढलेली असून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या या फेरिवाल्यांचा देखील बंदोबस्त करणे आवश्यक आहे :- पंकज राऊत - वरिष्ठ पत्रकार लोकमत बोईसर
Comments
Post a Comment