तलासरी येथे पालघर पोलिसांकडून ४ कोटी ३३ लाखांची रोकड जप्त

तलासरी येथे पालघर पोलिसांकडून ४ कोटी ३३ लाखांची रोकड जप्त 


पालघर: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असताना, लाचखोरी रोखण्यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु आहे. यात तलासरी येथे पालघर पोलिसाकडून ४ कोटी ३३ लाखांची रक्कम जप्त करण्यात आली असून विविध ठिकाणी लाखो रुपये व साहित्य जप्त करण्यात आले आहेत. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू आहे. या आचारसंहितेच्या काळात निवडणुकीत मतदारांना वळवण्यासाठी पैशांचं आमिष दिलं जातं. त्यामुळे अशाप्रकारचं कृत्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाते. पोलिसांकडून राज्यभरात अशाप्रकारची कारवाई सुरु आहे. यात दि. ३० ऑक्टोंबर रोजी सिल्वासा येथून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या जी जे ०१ जे टी ८८४८ टाटा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या एचडीएफसी बँकेच्या सिल्वासा शाखेच्या एटीएमच्या वाहनाचा वापर करून गाडीतुन येणारी रक्कम तलासरी, उधवा तपासणी नाका, येथे पालघर पोलिसांकडून ४ कोटी ३३ लाखांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. या पूर्वी दि. २३ ऑक्टोंबर रोजी स्थिर संनिरीक्षण चमू ( SST) मार्फत रुपये ३ लाख २७ हजार ५०० रुपये इतकी रक्कम जप्त करण्यात आली त्यानंतर दिनांक २७ ऑक्टोंबर रोजी SST मार्फत बोईसर येथून रू ४ लाख रुपये रक्कम जप्त करण्यात आले तसेच दिनांक २६ ऑक्टोंबर रोजी भरारी पथका मार्फत तपासणी नाका,दापचारी, तालुका तलासरी येथून निवडणुक  विषयक साहित्य मफलर, टोप्या, झेंडे व गमछे इ.साहित्य अंदाजित रू.१२ लाख ४३ हजार इतक्या रकमेचे साहित्य जप्त करण्यात आले असून कोषागार कार्यालय पालघर येथे ठेवण्यात आले आहे. तसेच कुणीही विनापरवाना ५० हजारा पेक्षा अधिक रोख रक्कम जवळ बाळगू नये असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद बोडके यांनी केले आहे.


सदरची कारवाई जिल्हाधिकारी गोविंद बोडके आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपअधीक्षक अनिल लाड , पोलीस निरीक्षक विजय मुतडक ,पोलीस उपनिरीक्षक कुणाल चौधरी  यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.



Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी