कारखाना प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मेकॉय फार्मा कारखान्यात महिलेनी गमावला बोट...

कारखाना प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मेकॉय फार्मा कारखान्यात महिलेनी गमावला बोट...


बोईसर :  तारापूर औद्योगिक क्षेत्रातील  कारखान्यात कामगार सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. कारखान्यात पुरेसे सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळे अपघात वाढ होत असतानाच चक्क सुपरवायझरच्या धाकाने एका महिलेला हाताचा बोट गमावण्याची वेळ आली आहे.


तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक एस १२ मे. मॅककॉय फार्मा प्रा. लि. या कारखान्यात ठेका पद्धतीत काम करणाऱ्या महिला कामगार पार्वती शंभू यादव वय ४७ वर्ष यांच्या हाताचा बोट उभा असलेल्या पंखांच्या आत अडकल्याने या महिलेला हाताचा बोट गमवायची वेळ आली आहे. सदर घटना घडल्यानंतर त्याचवेळी त्या महिला कामगाराला बोईसर येथील संजीवनी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार पार्वती शंभू यादव आणि ठेकेदार यांच्यात झालेल्या करारानुसार पार्वती यादव या पॅकिंग विभागात काम करत होत्या. परंतु दि . २७ सप्टेंबर २०२४ रोजी पार्वती शंभू यादव या  नेहमीप्रमाणे मॅककॉय फार्मा प्रा .लिमिटेड या कारखान्यात कामावर गेली असता सकाळी ८:३० च्या सुमारास कारखान्यातील पर्यवेक्षकांनी (सुपरवायझर) यांनी पार्वती यादव यांना बाजूला उभा असलेला सुरू पंखा त्या ठिकाणाहून सरकवायला सांगितले पर्यवेक्षकाने सांगितलेले काम तातडीने करावे नाहीतर आपल्याला ओरडा ऐकावयास मिळेल या भीतीने  पार्वतीने तो पंखा बंद न करताच घाईगडबडीत उचलला असता तिच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोट पंख्यामध्ये अडकल्याने तो बोट ८०% पेक्षा जास्त कापला गेला आहे. उपचारासाठी संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पार्वती यादव यांना दि . ५ऑक्टोबर २०२४ रोजी रुग्णालयातून सोडण्यात आले असून कापल्या गेलेल्या बोटाच्या पुढील उपचारासाठी पुन्हा एकदा दि. १० ऑक्टोबर रोजी संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यास येणार असल्याचे डॉ भानुशाली यांनी सांगितले आहे. 


दरम्यान उपचारासाठी रूग्णालयात दाखल असलेल्या पार्वती यादव यांच्यासोबत संवाद साधला असता या कारखान्यात ठेका पद्धतीने काम करत असताना साडेनऊ तासांपेक्षा जास्त वेळ काम करून घेऊन दिवसाकाठी केवळ तीनशे रुपये पगार दिला जातो अशी खंत व्यक्त केली आहे. तर लाडकी बहिण योजना राबवून महिलांना महिनाकाठी रू १५०० देऊन बहिणींना आर्थिक मदत करणाऱ्या शिंदे सरकारच्या राज्यात याच महिलांना ९ ते १० तासांपेक्षा जास्त राबवून घेणाऱ्या कारखानदार व ठेकेदार मोकळे फिरत असल्यामुळे पार्वती यादव सारख्या महिलांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी