नियम धाब्यावर बसवून दांडिया रास रंगने रस्त्यावर उभारले मनोरमे
नियम धाब्यावर बसवून दांडिया रास रंगने रस्त्यावर उभारले मनोरमे
बोईसर : बोईसर शहरातील बोईसर तारापूर रस्त्यावरील सर्कस मैदानावर दिनांक ३ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान दांडिया रास रंगाचे नियोजन करण्यात आलेले आहे. तशी परवानगी मे. ट्युनिटी इव्हेंट्स ॲंड स्पेसेस एल एल पी या कंपनीला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आलेली असून विश्वास फाउंडेशन द्वारा या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलेला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेला परनाळी बोईसर पांचाळी उमरोळी पालघर रस्ता प्रजिमा -२८ या रस्त्यावर कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊन हा उत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अटी शर्तीच्या आधारावर दि २३ सप्टेंबर २०२४ रोजी हि परवानगी देण्यात आलेली असून या परवानगीत नमूद केल्याप्रमाणे आयोजकांकडून दक्षता घेतल्याचे दिसून येत नाही. रस्त्याच्या मध्यापासून १५ .०० मीटर अंतरावर कमानी बॅनरची तात्पूरती उभारणी करण्याचे स्पष्ट शब्दात अट असताना रस्त्यावरच या कमानी उभारल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होणार असून वेळप्रसंगी अपघात देखील होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तसेच या कमानी, बॅनर उभारताना स्ट्रक्चरल ऑडिट करणे किंवा स्ट्रक्चरली सक्षम आहेत का याबाबची खात्री स्ट्रक्चरल कन्सल्टंट यांच्याकडून करून घेऊन तसे दाखले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सादर करावे असेही या या नाहरकत दाखल्यात नमूद करण्यात आलेले असताना पैसे घेऊन प्रेक्षकांना सुरक्षितता देणाऱ्या विश्वास फाउंडेशन कडून मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून वाहतूक कोंडी समस्या निर्माण करून नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडला जात असताना अटी शर्तीच्या आधारावर परवानगी देणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या गरब्याच्या रास रंगात तल्लीन झालेत का ? का नाही नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करत आहेत हे अधिकारी ? लाखो रुपये खर्च करून कोटी रुपयांची वसुली करणाऱ्या रास रंगात या अधिकाऱ्यांचा हिस्सा किती ?
रस्त्यावर असलेले कमानी बॅनर काढून टाकण्याचे आदेश देतो असे सांगून टोलवाटोलवी करणाऱ्या कार्यकारी अभियंता सचिन पाटील यांना बोईसरवांसिच्या समस्येबाबत गांभीर्य नाही का ? नटीना नाचवून गर्दी जमा करून नागरिकांना त्रास देणारा हा कुठला दांडिया रास रंग ? आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या आयोजक विश्वास वळवी यांना बोईसरच्या नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा कुठलंही सोयरसुतक नाही का ? लगतच असलेल्या डॉन बॉस्को, सी बी संखे शाळेतील विध्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाचा विश्वास वळवीला काय फरक पडतो ?
अपना काम बनता ..ड जाय जनता
Comments
Post a Comment