मुलांचे अपहरण करुन पळवून घेऊन जाणाऱ्या आरोपींना कासा पोलिसांनी केले जेरबंद

मुलांचे अपहरण करुन पळवून घेऊन जाणाऱ्या आरोपींना कासा पोलिसांनी केले जेरबंद 

पालघर : महात्मा फुले पोलीस ठाणे जि. ठाणेचे हद्दितुन मुलांचे अपहरण करुन पळवून घेऊन जाणाऱ्या आरोपीना जेरबंद करण्यास कासा पोलीस ठाणे यांना यश आले आहे.

दि.०३ ऑक्टोंबर रोजी पासून सर्वत्र नवरात्रौत्सव हा अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे. नवरात्रौत्सव सणादरम्यान विविध नवरात्रौत्सव मंडळे, हाउसिंग सोसायट्यांमध्ये आणि गावागावांमध्ये गरब्याचे आयोजन केले जाते. गरब्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आपआपले हद्दित प्रभावी गस्त करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. 


त्याअनुषंगाने दिनांक ०४ ऑक्टोंबर रोजी २१:०० वा. कासा पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी पोनि/ अविनाश मांदळे, सोबत पोहवा /मनोहर जाधव, चालक पोहवा /जगदिश जाधव, पोशि/ ईस्त्राईल चाँद सय्यद हे डायल ११२ पोलीस ठाण्यातील वाहनामधुन पोलीस ठाणे हद्दित नवरात्र / गरबा बंदोबस्ताचे अनुषंगाने रात्रौगस्त करत असतांना चारोटी ब्रिजच्या खाली काही इसम व महिला आपसामध्ये वादविवाद करुन एकमेकांना मारहाण करत असल्याचे दिसले म्हणुन सदरच्या पथकाने वाहन थांबवुन भांडण सोडविण्यासाठी गेले. सदर भांडण करणाऱ्या महिला व पुरुषांजवळ दोन लहान मुल बसल्याचे दिसल्याने प्रथम भांडण सोडवुन मुलांना विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी भांडण करणारे महिला व पुरुषांनी त्यांना कल्याण येथुन पळवुन आणल्याचे सांगितले. मुलांच्या देहबोलीवरुन ते खरे बोलत असल्याची खात्री झाल्याने त्वरीत सदर इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नांव पत्ता विचारता त्यांनी १) विनोद रामबापु गोसावी, वय २९ वर्ष, २) आकाश विजेश गोसावी, वय २८ वर्ष, ३) अंजली विजेश गोसावी, वय २८ वर्ष, ४) चंदा विजेश गोसावी, वय ५५ वर्ष, ५) जयश्री अशोक गोसावी वय २५ वर्ष, ६) राहुल रामअप्पा गोसावी, वय २७ वर्ष, सर्व रा. मेशाळ विजयनगर ता. मिरज जि. सांगली असल्याचे सांगितले. तसेच लहान मुलांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी १) वय ८ वर्ष, २) वय ५ वर्ष, असे सांगितले. मुलांकडे केलेले चौकशीतुन त्यांना कल्याण येथुन नमुद ताब्यात घेतलेले इसमांनी पळवुन आणले बाबत पुष्ठी मिळत असल्याने त्वरीत कल्याण महात्मा फुले पोलीस ठाणे जि. ठाणे येथे संपर्क केला असता तेथे गुन्हा रजि. नं. १०११/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३७ (२) प्रमाणे वर नमूद मुलांचे अपहरण झालेबाबत गुन्हा नोंद असल्याची खात्री झाली. सदर बाबत महात्मा फुले पोलीस ठाणे जि. ठाणे यांना संपर्क साधुन आरोपीत व अपहरीत मुले यांचेबाबत माहिती देवून आरोपीत व अपहरीत मुले यांना त्यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी  बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक पालघर, गणपत पिंगळे, उप विभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश मांदळे, प्रभारी अधिकारी, कासा पोलीस ठाणे, पोहवा / १२५ मनोहर शंकर जाधव, चालक पोहवा /९५ जगदिश श्रीधर जाधव, पोशि/११५२ ईस्त्राईल चाँद सय्यद सर्व नेमणुक कासा पोलीस ठाणे यांनी उत्कृष्टरित्या केलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी