राजीव पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश न करण्याच्या निर्णया बरोबर विधानसभा निवडणुकीतूनही घेतली माघार

राजीव पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश न करण्याच्या निर्णया बरोबर विधानसभा निवडणुकीतूनही घेतली माघार 


पालघर : वसई-विरार महापालिकेचे माजी महापौर राजीव पाटील हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. विशेष म्हणजे बहुजन विकास आघाडीमध्ये बंड करून राजीव पाटील यांनी भाजपामध्ये जाण्याचा निर्धार केला होता. मात्र आता त्यांनी भाजपामध्ये प्रवेश न करण्याबरोबर विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती समोर येत आहे

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागावाटपावरील चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. तर दुसरीकडे उमेदवारीसाठी इच्छुक नेते पक्षांत्तर करताना दिसत आहे. मुंबईला लागूनच असलेल्या वसई-विरार महापालिकेचे माजी महापौर राजीव पाटील हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. विशेष म्हणजे बहुजन विकास आघाडीमध्ये बंड करून राजीव पाटील यांनी भाजपामध्ये जाण्याचा निर्धार केला होता. मात्र आता त्यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती समोर येत आहे. 


हितेंद्र ठाकूर यांचे आतेभाऊ आणि बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष राजीव पाटील हे गेल्या काही दिवसांपासून भाजपा जाणार असल्याची चर्चा सुरू होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू होती. भाजपात प्रवेश केल्यानंतर राजीव पाटील आमदार क्षितीज ठाकूर यांच्या नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून त्यांच्याच विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता होती.

याचपार्श्वभूमीवर राजीव पाटील यांनी मागील काही दिवसांत नवरात्रोत्सवात भाजपा कार्यकर्त्यांच्या मंडळांना भेटी दिल्या होत्या. तर दुसरीकडे गेल्या 25 वर्षांपासून वसई विरारच्या राजकारणात एकहाती सत्ता असणाऱ्या हिंतेंद्र ठाकूर यांनी महायुतीची साथ सोडत महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचीही चर्चा रंगली होती. मात्र आता भाजपाच्या वाटेवर असणाऱ्या राजीव पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेतला असल्याची माहिती सूत्राने दिली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, राजीव पाटील बंडाच्या तयारीत असतानाच त्यांच्या 89 वर्षीय मातोश्रींनी नाराज होऊन अन्नपाणी सोडले होते, तसेच राजीव पाटील यांच्याजवळ बोलण्यास नकार दिला होता. आपल्याच भावा आणि पुतण्याविरुद्ध का लढतोय? त्यांच्या मातोश्रींनी विचारला होता. या भावनिक विचारांनी राजीव पाटील यांना निवडणुकीतून माघार घेण्यास भाग पाडले असल्याचे समजते. यानंतर राजीव पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश न करण्याचा निर्णयही घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे बहुजन विकास आघाडीतील समर्थक आणि कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त होताना दिसत आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी