रिलायन्स टेक्स्टाईल पार्क प्रकल्पामुळे बागायत व मासेमारी येणार संकटात

रिलायन्स टेक्स्टाईल पार्क प्रकल्पामुळे बागायत व मासेमारी येणार संकटात 

मोर्चाची सरकारने दखल घेतली नाही, तर यापुढे उग्र आंदोलन करणार


पालघर : पालघर तालुक्यातील रिलायन्स कंपनीसाठी देण्यात येणाऱ्या माहीम टोकराळे येथे ८०० एकर वर उभारणाऱ्या रिलायन्सच्या टेक्सटाईल पार्कच्या विरोधात माहीम, केळवे, वाकसई, ठोकराळे व कमारे ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांनी ८ ऑक्टोबर रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

यावेळेस तीन ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच एकवटल्या. माहीम ग्रामपंचायतच्या सरपंच प्रीती पाटील, कमारे ग्रामपंचायतच्या सरपंच वैशाली पडवळे आणि वाकसई ग्रामपंचायतचे सरपंच माधवी हाडळ या आणि केळवे ग्रामपंचायतचे सरपंच संदीप किणी यावेळी उपस्थित होते. आमच्या या परिसरात टेक्स्टाईल पार्क प्रकल्प उभारून परिसरात पर्यटन विकसित होण्याऐवजी होणार्‍या संभाव्य जलप्रदूषणामुळे येथील बागायत मासेमारीवर संकट येणार आहे. आज आमच्या ग्रामपंचायतीच्या परिसरात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. पिण्यासाठी पाणी पुरत नाही आणि टेक्सटाईल पार्कसाठी कोट्यावधी लिटर पाण्याची गरज लागणार आहे ,असे आंदोलकांचे म्हणणे आहे. या मोर्चाची सरकारने दखल घेतली नाही, तर यापुढे मात्र आम्ही उग्र आंदोलन करणार आहोत.


मोर्चा पालघर शिवछत्रपती चौकावरून बोईसर मार्गे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी सरपंचांची आणि अ‍ॅडवोकेट हेमप्रकाश तरडे आदींची भाषणे झाली. यानंतर मागण्यांचे निवेदन सरपंच, उपसरपंच यांनी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना दिले. आपले निवेदन शासनाकडे पाठविले जाईल. आपल्या निवेदनात उल्लेखित न्यायालयाच्या आदेशा संदर्भातील बाबीचा अभ्यास केला जाईल. सध्या जमिनीचे मोजमाप चालू आहे. कोणत्याही कंपनीला जागा अजून दिलेली नाही, त्याचा अभिप्राय वरिष्ठ स्तरावर कळविण्यात येईल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी