अवैध धंद्याना पाठबळ व वाचविण्यासाठी काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात.....?
अवैध धंद्याना पाठबळ देणारे काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात.....? पालघर : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी उडाली असताना ग्रामपंचायत निवडणुकीने सर्व गावात उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सरपंचाला स्वतःच्या पॅनलचे सदस्य निवडून आणण्यासाठी आटापिटा करावा लागत असल्याने निवडणुकीची चुरस वाढली आहे तसेच सदस्य निवडणुकीसाठी देखील जोरदार चुरस असून सदस्यांची वॉर्डातील मते सरपंचासाठी महत्त्वाचे असल्याने रिंगणातील सदस्य देखील पॅनलसाठी महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंच पद्धतीमुळे जोरदार रस्सीखेच वाढली आहे. थेट सरपंच व सदस्य पदासाठीही नवोदित चेहरे रिंगणात उतरले असले तरी गावच्या राजकारणातील वर्षानुवर्षाचे गट या निमित्ताने आमने-सामने आले आहे. त्यामुळे उमेदवारांच्या राजकीय वर्चस्वासाठी कसोटी लागली असली तरी गावच्या नेत्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न देखील या निमित्ताने ठरणार आहे. यातच आता काही दिवस राहिल्याने सर्वत्र प्रचाराची धामधूम सुरू आहे. यातच सरावली ग्रामपंचायत मात्र चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. औद्योगिक क्षेत्रामुळे वाढते नागरीकरण पाहता...