पाम ग्रामपंचायतीच्या वतीने 'स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविला
पाम ग्रामपंचायतीच्या वतीने 'स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविला
पालघर : पाम ग्रामपंचायतीच्या वतीने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘स्वच्छता ही सेवा’ २०२३ अंतर्गत १ ऑक्टोबर रोजी ‘एक तारीख एक तास’ हा स्वच्छता उपक्रम सकाळी दहा वाजता राबविण्यात आला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस “स्वच्छ भारत दिवस” म्हणून साजरा केला जातो. यावर्षी “स्वच्छ भारत दिवस २०२३” च्या निमित्ताने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत “स्वच्छता ही सेवा” हा उपक्रम स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार असून, दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी देशभरात प्रत्येक गावात, शहरात व्यापक स्वरूपात “एक तारीख- एक तास” स्वच्छतेसाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे.
असाच उपक्रम पाम ग्रामपंचायत द्वारे स्वच्छता हीच सेवा कचरा मुक्त भारत या महाश्रमदान मोहीम अभियान अंतर्गत मौजे पाम गावाचे सरपंच दर्शना पिंपळे, उपसरपंच मनोज पिंपळे, ग्राम विकास अधिकारी प्रकाश पाटील, सर्व सदस्य व कर्मचारी रुंद यांनी ग्रामस्थां समवेत गावातील अंगणवाडी शाळा, मुख्य रस्ता मार्केट इत्यादी ठिकाणाची सफाई करून कचरा मुक्त भारत अभियान राबविण्यात आले.
Comments
Post a Comment