जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळीत : सरावली ग्रामपंचायत अग्रेसर
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळीत : सरावली ग्रामपंचायत अग्रेसर
बोईसर : जानेवारी ते डिसेंबर 2023 या चालु वर्षात कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायती बरोबरच पोटनिवडणुक जाहीर झाले आहेत. सोमवार 16 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असुन शुक्रवार 20 तारखेला शेवटची मुदत आहे तर 5 नोव्हेबरला मतदार होणार आहे यामुळे आता राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे.
सरपंच थेट जनतेतुन निवडला जाणार असल्याने राजकीय गट या निवडणुका प्रतिष्ठा पणाला लावून लढणार आहेत. ही निवडणुक प्रत्यक्षात पक्ष चिन्हावर लढविली जाणार नसली तरी प्रत्येक राजकीय पक्ष आपलीच सत्ता यावी, आपल्या विचाराचे उमेदवार असावेत यासाठी प्रयन्तशील असणार आहेत त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरस वाढली आहे. स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहे. ग्रामपंचायतची निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी स्थानिक स्तरावर पॅनल तयार करून या निवडणुका लढविल्या जातात त्यातच सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्यात येते. त्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर ग्रामीण भागातील राजकारण अधिकच तापलेले असून गावा गावात आता निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्याचे चित्र आहे. अश्याच निवडणूकीत बोईसर मधील सरावली ग्रामपंचायतीचा देखील कार्यकाळ पूर्ण होत असून नोव्हेंबर मध्ये घेण्यात येणाऱ्या निवडणुकीत सरावली ग्रामपंचायतीचा समावेश असून ही निवडणूक चूरशी होणार असे चिन्ह दिसून येत आहे.
सरावली ही श्रीमंत ग्रामपंचायत असुन सर्वच पक्षाने कंबर कसली आहे त्यात कोणत्याही पक्षाने अजूनही आपले सरपंच व सदस्य यांची घोषणा केलेली नाही तसेच काही पक्षात गटबाजी असल्या कारणाने आपल्या जवळच्या व्यक्तिला उमेदवारी कशी दिली जाईल यासाठी सर्वत्र धडपड चालु आहे सरावली ग्रामपंचायत हद्दीत औद्योगिक क्षेत्र व बरेच लहान मोठे उद्योग आहेत तसेच सरावली ग्रामपंचायत ही बोईसर च्या जवळ व औद्योगिक क्षेत्रातील कचरा व भंगार यांचा मुख्य बाजार असल्याकारणाने ग्रामपंचायतीला चांगलाच उत्पन्न असल्याने सर्वच जण आपला धंदा व अस्तित्व टीकविण्यासाठी आप आपल्या परीने निवडणुकीत स्वत: किंवा आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत तसेच आता काही लोकांनी बैठकिला सूरवात झाली असुन काही लोक एकत्र येऊन व्यूहरचना आखत आहेत तसेच जे मतदार कामधद्यानिमित्त बाहेरगावी वास्तव्यास असणाऱ्याना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे तर काही लोकांची गाववारी सुरु झाली आहे त्यातच काही लोक आपल्या विरोधात उभे राहण्याऱ्याचे उमेदवारी कश्याप्रकारे रद्द करता येईल यासाठी सर्वत्र धडपड करताना दिसून येत आहे.
Comments
Post a Comment