सोशल मिडियावर आक्षेपहार्य मैसेज टाकणे ठरु शकते गुन्हयास पात्र
सोशल मिडियावर आक्षेपहार्य मैसेज टाकणे ठरु शकते गुन्हयास पात्र
सामाजिक शांतता अबाधित राखण्याचे तारापूर पोलिसांकडून नागरिकांना आवाहन !
तारापूर: आज प्रत्येकजण सोशल मीडियाचा वापर करत आहे. वेगवेगळ्या फोटो, व्हिडिओ अशा अनेक गोष्टी आपण या ट्विटर, फेसबुक,इंस्टाग्राम, व्हाट्सअप सारख्या प्लॅटफॉर्म्सवर शेअर करत असतात मात्र, अशा प्लॅटफॉर्म्सचा वापर करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही शेअर केलेली एक पोस्ट तुम्हाला महागात पडू शकते व यासाठी जेलमध्ये देखील जावे लागू शकते. सोशल मीडियावर चुकीची पोस्ट टाकल्यास कायदेशारी कारवाई ही केली जाते.
हल्ली सोशल मिडियावर काही आक्षेपाचे मँसेज व्हायरल होत असून त्यामुळे समाजात तणावाचे वातावरण निर्माण होत आहे.अफवा पसरविणे त्याद्वारे सामाजात तेढ निर्माण होईल असे आक्षेपहार्य मँसेज सोशल मिडीयावर टाकणे गुन्हा आहे. त्याबाबत भारतीय दंड संहिता कलम १५३( अ) १५३ (ब)२९८,२९५(अ) ५०५(ब ) अन्वये गुन्हा असून त्या करीता तीन वर्षाचा करावास किंवा दंड अशी तरतूद आहे.
देशाच्या, राज्याच्या, जिल्ह्याच्या अंखडतेला कोणी बाधा आणत असेल व सामाजिक शांतता भंग करित असेल तर अशा व्यक्तिवर पोलिसांना कारवाई करण्याचा अधिकार आहे .एकदा अशा व्यक्तिवर गुन्हा दाखल झाला तर त्यांचे भविष्य धोक्यात येते व त्याने केलेल्या चुकीचे दुष:परिणाम त्याच्या कुंटूंबियांना भोगावे लागते.अशा व्यक्तिचे जीवन बरबाद होते .म्हणून असे चुकीचे मँसेस सोशल मिडीयावर टाकण्यापूर्वी विचार करावा व मँसेज डिलिट करून टाकावा. आपल्या परिसरातील सामाजिक शांतता ,सलोखा जपण्याची जबाबदारी प्रत्येक नागरीकांची असून ,चुकीच्या अफवावर कोणी विश्वास ठेऊ नये व पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन तारापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेश सांळुके यांनी तारापूर येथील मस्जिद भागांतील जमलेल्या नागरीकांना सामाजिक शांतता अबाधित राहण्यासाठी मार्गदर्शन करतांना केले. यावेळी वाणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अल्पेश भिसे यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. त्यावेळी मुस्लिम सुन्नत जमात चे अध्यक्ष अब्दुल्ला सोपरकर, सय्यद जमालशाह दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष मुक्तार गवंडी ,महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सलीम गवंडी ,शब्बीर (बल्लू) दमनवाला ,राजू गवंडी , अजिजुरहमान दमनवाला ,मुस्लिम सुन्नत जमात चे उपाध्यक्ष नवशाद सैनिला अलाबक्स सोपारकर, मुस्ताक पटणी ,मिसबा गवंडी, अफजल शेख,शोएब अत्तारी,शहेबाज शेख सह अनेक तरुण वर्ग व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment