बोईसर रंग रासची सुरक्षा चव्हाट्यावर

बोईसर रंग रासची सुरक्षा चव्हाट्यावर

नवरात्र दरम्यान येणारे शेकडो रसिकांची सुरक्षा धोक्यात


बोईसर : बोईसर शहरातील वाढते नागरीकरणामुळे बोईसर तारापूर मुख्य रस्त्यावर नेहमीच वाहतुक कोंडी होत असते अगदी रस्त्यालगत ठाण मांडून बसणारे बेशिस्त फेरीवाले अश्यातच भर बोईसर सर्कस मैदान म्हणून प्रसिद्ध असलेल्या भूखंडावर वर्षभरात अनेक वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात परंतु कार्यक्रमाच सुनियोजन न केल्यामुळे या रस्त्यावर प्रवास करण्याऱ्या नागरिकांना यांचा त्रास सहन करावा लागतो.


बोईसर शहराचे वाढते नागरीकरण तसेच बोईसर- पालघर पासून ते डहाणू पर्यंत च्या परिसरातील ग्रामस्थांची नाळ बोईसर शहराशी जोडलेली असताना उत्सवामध्ये चित्रालय बोईसर, ओस्तवाल बोईसर नवापूर नाका - अवधनगर हा परिसर गजबजलेला असतो. यावेळी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत असताना या प्रसिद्ध भल्या मोठ्या सर्कस मैदानावरील होत असलेल्या कार्यक्रमामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

अश्याच या सर्कस मैदानावर दिनांक १५ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर या दरम्यान बोईसर रंग रास याचे आयोजन करण्यात आलेले असून आयोजक यांच्याकडून या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी येणाऱ्या व या कार्यक्रमाचे आनंद लूटण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहनांसाठी कुठल्याही प्रकारची वाहन तळ व्यवस्था केल्याची दिसत नसून बोईसर तारापूर मुख्य रस्त्यावर सिडको येथे मुख्य रस्त्यावरच प्रवेशद्वार ठोकल्यामुळे पादचारी नागरिकांना तसेच आजूबाजूच्या नागरी वस्तीला नाहक त्रास सहन करावा लागणार आहे तसेच प्रवेश द्वार ज्या ठिकाणी लावले आहे, त्याला बांबू बांधून तो  थेट अकरा केवीच्या विद्युत पुरवठा खांबाला बांधलेला असल्याने ह्या कार्यक्रमांमध्ये यदा कदाचित पाऊस पडला तर त्या प्रवेशद्वाराला करंट लागून त्या ठिकाणी मोठा अपघात घडू शकतो तसेच सदर कार्यक्रमाकरिता तात्पुरता विद्युत पुरवठा विश्वास वळवी यांच्या नावे घेतला असून तो तंगाच्या आधारावर  भिंतीला लटकवलेला आहे. त्याकरिता कोणतीही अशी भक्कम सुरक्षा व्यवस्था केलेली नाही त्याची वीजजोडणी ही हार्मोनियम या रहिवासी सोसायटी मधून दिलेला असून या ठिकाणी सुद्धा यदाकदाचित पाऊस सुरू झाला तर त्याचा करंट हा भिंतीला लागून तिथेही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्याचप्रमाणे गणेश उत्सवाच्या वेळेस वाहतूक नियंत्रण शाखेने या ठिकाणी एक पदरी रस्ता सुरू केल्याने सुरक्षित अशी वाहतूक होत होती मात्र सर्कस मैदानावर होणाऱ्या दांडिया रास हा नऊ रात्र सतत चालणार असल्याने त्या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी