सरकारी जमिनींवर अतिक्रमण करून भूमाफियानी केले बेकायदा बांधकाम

सरकारी जमिनींवर अतिक्रमण करून भूमाफियानी केले बेकायदा बांधकाम


बोईसर : बोईसर शहरात सरकारी जमिनीवर अतिक्रमण होण्याचे भरपूर प्रकार समोर येत आहेत. वाढती लोकसंख्या आणि जागेचा मिळणारा उत्तम भाव यासाठी भूमाफिया आता सरकारी जमीनी बळकावत असुन तलाठी व संबंधित अधिकारी बघ्याची भूमिका असल्यामुळे सरकारी जागेवर अतिक्रमण व बांधकामे मोठ्याने झालेली दिसून येतात 


पालघर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी सरकारी व वन विभागाच्या जमिनीवर भूमाफियांनी अनधिकृत जमिनी बळकावून त्या ठिकाणी मोठमोठी बांधकामे सुरू केलेली आहे . परंतु संबंधित खात्याचे अधिकारी अशा या सुरू असलेल्या बांधकामावर डोळे झाक करत आहेत.

     बोईसर शहरातील गणेश नगर व इतर ठिकाणी वन विभागाच्या जमीन व इतर सरकारी जमिनीवर भूमाफियाने मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू करून त्या ठिकाणी मोठमोठ्या चाळी उभारल्या ह्या बाबतीत सोशल मीडिया व वृत्तपत्रांमध्ये  बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तसेच तक्रारदाराने लेखी तक्रार देऊन सुद्धा त्या बांधकामाकडे तलाठी व संबंधित अधिकारीने जाणून-बुजून दुर्लक्ष केल्यामुळे आज त्या भागामध्ये मोठ - मोठी अतिक्रम व बांधकामे झालेली दिसून येतात . ही बांधकामे व अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाल्याने जनतेमध्ये संबंधित अधिकाऱ्यांविषयी संशय व्यक्त केला जात आहे .

  

तसेच सरावली हद्दीतील बोईसर पालघर या मुख्य रस्त्यावर बेटेगाव मान येथून वाहून येणारे पाणी अरबी समुद्रात मिळणाऱ्या खाडी लगत पश्चिम बाजूस सर्व क्रमांक ९/१, ९/२, ९/३/१, ९/४ या भूखंडावर अनधिकृत बांधकाम सुरू असून जमिनमालक व खरेदीदार यांनी रोड लगत माती भरावं करून बिनशेती भूखंडाचा उपयोग केलेला आहे. अशा बेकायदेशीर माती भरावामुळे बोईसर सरावली पालघर रोडच्या पश्चिमेकडून वाहून जाणारे पाणी रस्त्यावर साचून पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन वाहतूक बंद होण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी देखील याठिकाणी पाणी अडवून पूरस्थिती निर्माण झाली होती ह्या रस्त्याने संबंधित विभागाचे अनेक अधिकारी ये-जा करीत असतात. मग त्यांना ही अनधिकृत बांधकामे दिसत नाहीत का?  की ह्या भूमाफिया बरोबर काही धागे दोरे तर नाहीत ना ? असा प्रश्न जनतेला भेडसावत आहे.

     

 बोईसर पालघर रस्त्यावरील सरावली पुलाच्या आजूबाजूला अनेक अनधिकृत बांधकामे सुरू असुन याबाबत अनेक तक्रारी करून सुद्धा महसूल विभाग दुर्लक्ष करत आहेत  त्यामुळे आता त्या ठिकाणी जोरदार दिवस रात्र काम सुरू असून मोठमोठे त्या ठिकाणी दुकाने उभारण्यात आली आहेत  . नक्की ह्या बांधकामावर आशीर्वाद कुणाचा? सदर सुरू असलेली अनधिकृत बांधकामे तोडली न गेल्यास भविष्यात पावसाचे  पाणी जाण्यास अडथळा होऊन तिकडे महापूर स्थिती निर्माण होईल ह्या मध्ये कोणतीच शंका नाही. सदर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण केलेल्या जमिनी तसेच ते खोदकाम करण्यासाठी संबंधित विभागाचे परवाने घेतले नसून शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडवला आहे. ह्याची चौकशी करून  त्याच्यावर योग्य ती कठोर कायदेशीर कारवाई करून त्या बांधकामावर तोडक कारवाई करण्यात यावी अशी जनतेकडून मागणी होत आहे.


सरकारी भूखंडावर बांधकाम सुरू होताच थांबविले किंवा निष्कासित केले पाहिजे जेणेकरून बांधकाम पूर्ण केल्यानंतर अडचण निर्माण होणार नाहीत. सर्व तलाठी, मंडळ अधिकारी यांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे :- रमेश शेंडगे तहसीलदार पालघर

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी