पाणी पूरी खाणे ठरु शकते आरोग्यासाठी हानिकारक...
पाणी पूरी खाणे ठरु शकते आरोग्यासाठी हानिकारक...
क्राइम अलर्ट : स्वप्निल पिंपळे
बोईसर : पाणी पुरी हा आपल्यापैकी अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण पाणी पुरी हा देशभरात सर्वत्र खाल्ला जाणारा एक लोकप्रिय पदार्थ आहे यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत लोक पाणीपुरी आवडीने खात असतात तसेच
बहुतांश लोक संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडतात आणि किमान एक प्लेट पाणी पुरी खाल्ल्याशिवाय घरी येत नाहीत. परंतु आपण जे खात आहोत त्याचा दर्जा चांगला आहे का नाही? तसेच अशा अन्नात वापरण्यात येणारे पदार्थ यांचा दर्जा कसा आहे. हे कोणालाच माहीत नाही. या कारणास्तव अनेक वेळा आपण इतके कुजलेले अन्न खातो की त्यानंतर आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.
बोईसर शहरात लोकसंख्या जास्त असल्यामुळे यांचा फायदा घेत काही लोक कमी गुंतवणूक करून जास्त नफा कमावण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्याकडे अनेकांचा कल नव्याने वाढला आहे. असाच बोईसर शहरातील संजय नगर येथे सध्या पाणीपुरीतील पुरी बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात सुरु आहे या पुऱ्या बनवताना वापरण्यात येणारे साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असुन या ठिकाणी बनवणाऱ्या येणाऱ्या पुऱ्या अशुद्ध तेलात तळल्या जात आहेत तसेच पुरीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांची मुदतही संपलेली होती तसेच ह्या पुऱ्या अतिक्रमण केलेल्या झोपडीत पत्र्याच्या शेडमध्ये कामगार काम करत आहेत. अस्वच्छ असणाऱ्या या जागेत सुरु असुन या ठिकाणी बनवण्यात येणाऱ्या पुऱ्या आरोग्यासाठी निश्चितच घातक ठरु शकतात.
Comments
Post a Comment