मुंबई-अहमदाबाद महामार्ग लगत असलेल्या अनधिकृत मनोर इन हॉटेलवर कारवाई कधी?
मुंबई-अहमदाबाद महामार्ग लगत असलेल्या अनधिकृत मनोर इन हॉटेलवर कारवाई कधी?
मनोर : मुंबई अहमदाबाद महामार्गालगत नांदगाव तर्फे मनोर येथील सर्व्हे नं.७२ मधील १० ते १२ गुंठ्यात बांधण्यात आलेल्या सियाब नामक व्यक्तींकडून चालवीत असलेले हॉटेल मनोर इन यामध्ये अन्नसुरक्षा प्रशासनाची कायदेशीर परवानगी न घेता हॉटेल व्यवसाय करीत असल्यामुळे प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्ग लगत असलेला मनोर इन हॉटेल जवळ बेकायदेशीर हॉटेल चालवताना दिसत आहे.परंतु याकडे महसूल विभागाने चहा पाणी घेतली आहे का ? अशी खमंग चर्चा होताना दिसत आहे. कारण निदर्शनास आल्यानंतर देखील याकडे प्रशासन कानाडोळा करताना दिसत आहे. गरिबांच्या झोपड्या तोडताना महसूल विभाग पुढे असतो तर माजलेले हॉटेल मालकांवर महसूल विभाग का कारवाई करत नाही असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे.
सदर जागेच्या व्यवहारात सुध्दा वर खाली व्यवहार झाल्याचा दिसून येत आहे. या ठिकाणची जागा आदिवासी खातेदार सुदाम बारक्या धापशी व सियाब अखलाक पटेल यांनी (१)ठकु दुद्या जाधव (२) मंजुळा कान्हा मानकर (३)प्रवीण कान्हा मानकर (४) प्रकाश कान्हा मानकर (५) सुंदर रामू साबळा (६) तारा सुनील वांगडा (७) कृष्णा कान्हा मानकर यांच्याकडून नोटरी कराराने तथाकथित विकत घेतल्याचे दिसून येत आहे. परंतु या व्यवहाराला खरेदीखताचे नाव दिलेले असून दि.२४/११/२०१२ रोजी नोटरी केलेल्या असून आज पर्यंत मिळकत विकत घेतल्या बाबत मूळ मालकाशी काहीही कागदोपत्री व्यवहार झालेला नाही.
महामार्गावर ७४ गुंठे जागा केवळ सहा लाख इतक्या कमी किंमतीस विकत देण्याबाबत मजकूर आहे.परंतु त्यापैकी एक लाख पन्नास हजार इतकी रक्कम चेक ने दिल्याबाबत उल्लेख आहे. यामध्ये विक्री परवानगी न आणता शासनाचा कर बुडविण्याकरिता ७५% दंड न भरता तथाकथित खरेदीखत केलेले आहे.तसेच मनोर इन हॉटेल महामार्ग लगत असल्यामुळे महामार्गाची रीतसर परवानगी घेणे आवश्यक असताना तशी परवानगी न घेतल्याचे निदर्शनास येत आहे.
हॉटेलमध्ये बेकायदेशीर अवैध दारू, अंमली पदार्थांचे विक्री जोमात सुरू असून अशा प्रकारे दारू व अंमली पदार्थ विक्रीला आशीर्वाद नेमका कुणाचा आहे. अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे स्थानिक पोलिसांची उदासीनता आणि राज्य उत्पादन खात्याच्या दुर्लक्षामुळे महामार्गावर अवैध दारू विक्रीत सर्रास वाढ होत आहे.
महामार्गावरील मनोर इन्न हॉटेलमध्ये गुटखा, अंमली पदार्थ व देशी-विदेशी दारू सहज मिळत असल्याने हॉटेल मध्यरात्रीपर्यंत सुरू असतो.
Comments
Post a Comment