शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी मच्छीमार भगिनीना मदत करून दिला कर्तव्याचा हात
शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी मच्छीमार भगिनीना मदत करून दिला कर्तव्याचा हात
बोईसर : आपल्या मेहनतीने मच्छीविक्री व्यवसाय करणाऱ्या मच्छीमार भगिनीकरीता शिवसेना जिल्हाप्रमुख पालघर व निर्धार सेवा संस्थानचे अध्यक्ष कुंदन संखे यांनी बोईसर खैराफाटक ब्रिजखाली रस्त्यालगत कुटुंबाचे उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छिमार भगिनींना कर्तव्याचा हात म्हणून काँक्रीट करून बसण्याची व्यवस्था करून दिली.
सदर मच्छीमार भगिनी ह्या आजुबाजुच्या गावातुन येत असुन गेल्या कोविड काळापासून हे मच्छीमार व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात परंतु मच्छीमार व्यवसाय करत असताना त्यांना बसण्याची व्यवस्था नसल्याकारणाने त्यांना व्यवसाय करताना त्रास होत होता तेव्हा त्यांनी आपली व्यथा कुंदन संखे यांना सांगितले की, आम्हा भगिनीना बसण्यासाठी सुविधा करून द्यावी आणि या विनतीचा मान देऊन कुंदन संखे यांनी सुंदर काँक्रीटकरण करून दिले.
कुंदन संखे यांनी निर्धार सेवा संस्थाच्या माध्यमातुन कोविड पासून आरोग्य, शैक्षणीक, अडचणीत किंवा गरजूना मदतीचा हात त्यांनी दिला आहे आणि त्याच माध्यमातुन त्यांनी मच्छीमार भगिनीकरीता काँक्रीटकरण देऊन मदत केली आहे.
जिल्ह्यात हजारो महिला मच्छिविक्री व्यवसाय करतात व अत्यंत मेहनतीने जागा असेल तेथे अथवा रस्त्याच्या कडेला मच्छिविक्री करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करतात. बोईसर खैराफाटक ब्रिजखाली रस्त्यालगत विपरीत परिस्थितीत व्यवसाय करण्याऱ्या महिलांनी आपली व्यथा मला सांगितल्यानंतर आपल्या मच्छिमार भगिनींना सहकार्य ह्वावे व थोडा हातभार लागावा, त्यांना चांगल्या वातावरणात व्यवसाय करता यावा याकरिता माझ्या माध्यमातून काँक्रीट करून बसण्याची व्यवस्था करून दिली यावेळी तेथे नारळ फोडून त्यांना शुभेच्छा दिल्या व स्थानिक मच्छिमार बांधवांना कुठल्याही प्रसंगात सहकार्य लागल्यास सदैव तत्पर असल्याची ग्वाही ही कुंदन संखे यांनी दिली व मच्छिविक्रेत्या महिलांनी कुंदन संखे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले .
याप्रसंगी पालघर विधानसभा क्षेत्रप्रमुख रवी चौधरी, कुंभवली एकलारे सरपंच ऍड.तृप्ती संखे, विभागप्रमुख व पाम उपसरपंच मनोज पिंपळे, चिंचणी विभागप्रमुख चेतन बारी, उपविभागप्रमुख विलास आरेकर, राज दांडेकर,युवासेना डहाणू तालुकाध्यक्ष अक्षय मरदे, कुंभवली उपसरपंच अमित संखे, माजी सरपंच दीपक संखे, रुपेश संखे, शिवसेना महिला आघाडीच्या ज्योती परब,शिवानी बारी, निकिता वझे, माधवी दांडेकर,सोनाली दवणे तसेच अतुल बारी,मयूर चौधरी, ग्रामपंचायत सदस्य राहुल संखे, हर्षल पिंपळे, प्रसाद पिंपळे, तन्मय संखे व सर्व मच्छिविक्रेत्या भगिनी उपस्थित होते.
Comments
Post a Comment