उमरोळीत आयडीयल सिटीमध्ये इमारत सामानाची चोरी : सीसीटीव्हीत चोर कैद
उमरोळीत आयडीयल सिटीमध्ये इमारत सामानाची चोरी : सीसीटीव्हीत चोर कैद
पालघर पोलीस ठाणे हद्दीतील उमरोळी पूर्व रेल्वेलगत आयडीयल सीटीमधे बऱ्याच इमारतीचे बांधकाम चालु असुन या ठिकाणी दिवसेंदिवस चोरीच्या प्रमाणात अधिकच वाढ होताना दिसत आहे यात इमारती करता लागणारे साहित्य लोखंडी सळई वीजेचे उपकरणे, विद्युत पुरवठा करणारी महागडी तांब्याची वायर, खिडक्यासाठी आणलेले अल्युमिनियम स्लायडींग तर खिडकीत फिटींग केलेल्या अल्युमिनियम स्लायडींग तोडून चोरल्याने विकासकांचे लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे त्यामुळे असे प्रकार वारंवार होत असल्याने विकासक हैराण झाले आहे.
अशीच घटना दिनांक २९ सप्टेंबर रोजी रात्री इमारत क्रमांक १ मधून विजेचे उपकरण, खिडकीत फिटींग केलेल्या स्लायडींग असे एकूण २५ हजार रूपयांचे साहित्य चोरांनी चोरी करुन अतिशय चपळाईने पळून गेला सदर घटनेची माहिती इमारतीच्या देखरेखदार यांना समजताच सी सी टिव्ही फुटेज पाहिले असता दिनांक २९ सप्टेंबर रोजी रात्री ११:३० वाजता एक अनोळखी इसम इमारतीतून पळ काढतांना दिसत आहे.
दरम्यान सदर प्रकरणाची फिर्याद पालघर पोलीस ठाण्यात देण्यासाठी गेलेल्या देखरेखदार यांना उलटसुलट प्रश्न विचारून परत जाण्यासाठी सांगितल्यामुळे फिर्याद देण्यासाठी गेलेले देखरेखदार व्यथित झाल्यामुळे पालघर पोलीस ठाणे हद्दीतील उमरोळी येथील आयडीयल सिटीमध्ये वारंवार घडणाऱ्या या घटना प्रकरणी पालघर पोलीस का कारवाई करत नाहीत असा प्रश्न उपस्थित करत पालघर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
◼️"सदर घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून लवकरच चोराला गजाआड केले जाईल:- पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील"
Comments
Post a Comment