औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाणगांव द्वारे श्रमदानातून स्वच्छता मोहिम राबवुन केली जनजागृती

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाणगांव द्वारे श्रमदानातून स्वच्छता मोहिम राबवुन केली जनजागृती


पालघर : पालघर जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था,  वाणगांव येथे दिनांक ०१ आक्टोंबर 2023 रोजी *स्वच्छता हीच सेवा*" हा उपक्रम पार पडला.

१ ऑक्टोबर २०२३ रोजी देशभरात प्रत्येक गावात, शहरात व्यापक स्वरूपात “एक तारीख- एक तास” स्वच्छतेसाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असुन असाच उपक्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाणगांव यांच्या राष्ट्रीय सेवा योजना व पोलीस ठाणे वाणगांव यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.


सदर कार्यक्रमात औद्योगिक प्रशिक्षण वाणगांव यांच्यातर्फे सोनचाफ्याचे झाड देण्यात आले असुन सदर झाडाचे रोप पोलीस स्टेशन परिसरात लावण्यात आले तसेच पोलीस स्टेशनच्या परिसरात व आसपासच्या परिसरात संपूर्ण स्वच्छता करण्यात आली व स्वच्छत्तेबाबतची जनजागृती करण्याकरीता वाणगांव परिसरात रॅली काढून जनजागृती करण्यात आली.



सदर कार्यक्रमाकरीता वाणगांव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे व उपनिरीक्षक वाघ तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रभारी प्राचार्य चंदन बंजारा, कार्यालयीन अधीक्षक योगेश तुंबडे, मिनल सावे, बापू मासुळे,   खताळ सर, काकड सर, चौधरी सर, जैन सर, राऊळ सर, पाटील सर, बोडोरे सर, प्रशिक्षणार्थी व पोलीस बंधू उपस्थित  होते.





Comments

Popular posts from this blog

आरती ड्रग्समध्ये वायूगळती; सालवड-शिवाजीनगर परिसरात भीतीचे वातावरण

बोईसरमध्ये ११ वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

डहाणूतील भीम बांधावर दुर्दैवी घटना – पर्यटक महिलेचा बुडून मृत्यू; १८ तासांनंतर मृतदेह सापडला