राधेश्याम निषादच्या बेकायदेशीर बांधकामाला महसूल अधिकाऱ्यांचा कारवाईस टाळाटाळ

राधेश्याम निषादच्या बेकायदेशीर बांधकामावर महसूल अधिकाऱ्यांची कारवाईस टाळाटाळ

काटकर गणेश नगरमध्ये नवीन शर्तीच्या भूखंडावर निषाद करतोय बिनधास्त बांधकाम


बोईसर: बोईसरमध्ये सरकारी जमिनींवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे उभी करण्याचा सपाटा सुरू आहे त्यातच 

बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील महसुली काटकर गणेश नगरमध्ये राधेश्याम निषाद नामक व्यक्तीने बेकायदेशीर इमारतीचे बांधकाम सुरू केलेले असून या बांधकामाला महसूल अधिकाऱ्यांचा आशिर्वाद असल्याचे तक्रारदाराचे म्हणणं आहे.


महाराष्ट्र पुनर्वसन जमिन लाभक्षेत्रातील काटकर सर्वे क्रमांक १००/१ (नवीन ४४) पैकी कुसुमजी जोशी व इतर लाभार्थ्यांना मिळालेल्या भूखंडावर राधेश्याम निषाद यांनी दुमजली इमारतीचे बेकायदेशीर बांधकाम सुरू केल्याची तक्रार धनेश क्षीरसागर यांनी ग्रामपंचायत बोईसर व महसूल विभागाकडे केलेली असून या बांधकामावर कारवाई करण्यासाठी महसूल अधिकारी आजतागायत कुठली कारवाई करत नसल्याचे तक्रार क्षीरसागर यांनी सांगितले आहे.


बोईसर ग्रामपंचायतीकडून देखील या बेकायदेशीर बांधकामाकडे दुर्लक्ष करत असल्याचे तक्रारांने सांगितले आहे.


दरम्यान महसूल अधिकारी व बोईसर ग्रामपंचायतीच्या आशिर्वादाने नवीन शर्तीच्या भूखंडावर सुरू असलेले दुमजली इमारतीचे बेकायदेशीर बांधकाम निष्कासित करून शर्तीचा भंग केल्या प्रकरणी सदर भूखंड शासन दरबारी करण्यासाठी तहसीलदार रमेश शेंडगे नेमकी कुठली भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी