पाम वृंदावन नगरीत गौरी बियर शॉप मधे सुरू आहे अवैध मध्य विक्री
पाम वृंदावन नगरीत गौरी बियर शॉप मधे सुरू आहे अवैध मध्य विक्री
बियर शॉप मधील अवैध मध्य विक्री मुळे बार असोसिएशन अडचणीत !
बोईसर :- पाम ग्रामपंचायत हद्दीतील वृंदावन नगरीत रहिवाशी विभागात गौरी बिअर शॉप मधे स्वदेशी व परदेशी मद्यविक्री विक्रीचे काम जोमाने सुरू असुन सदर दुकानदारानी मद्यपीना अवैध मध्य पिण्यासाठी लगतच बेकायदेशीर ठिकाण उपलब्ध करुन दिले आहे.
बियर शॉप आणि वाईन शॉपवर दुकानदारांनी मद्यपींना दारु पिण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिल्यास संबंधित मद्यविक्री परवानाधारकास मद्यपींवर देखील कारवाई करण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्क विभागाचे (दारूबंदी विभागाकडून) आयुक्तांचे निर्देश असताना देखील पाम ग्रामपंचायत हद्दीतील वृंदावन नगरीतील गौरी बियर शॉप येथे मोठ्या प्रमाणात बिअर शॉपच्या नावाने स्वदेशी व परदेशी मद्य विक्री आणि मद्य प्राशन सुरू आहे यासाठी बिअर शॉप वर मद्यपींना जागा उपलब्ध करत मद्यपींनासाठी चांगली सोय करुन दिल्याचे दिसून येत आहे.
पाम ग्रामपंचायत हद्दीतील वृंदावन नगरीतील गौरी बिअर शॉप वर दारूबंदी विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच सदर बिअर शॉप हा बोईसर येथील प्रसिद्ध हॉटेल मालक चालवीत असून त्याचे संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी जवळीक असल्याने वृंदावन नगरी तील गौरी बिअर शॉप वर सर्रासपणे बेकायदेशररित्या मद्य प्राशन आणि मद्य विक्री सुरू आहे तसेच अधिकारी व कर्मचार्यांनी मद्यविक्री दुकानांची नियमित तपासणी करण्याचे आदेश असूनही या कडे अधिकाऱ्यांचे विशेष दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील सुरू असलेल्या अनधिकृत धंद्यानवर आळा घातला आहे. जुगार, मटका, गुटखा, अंमली पदार्थ विक्री, यांच्यावर धाड सत्र सुरू केले असून जिह्यातील सर्व अनधिकृत धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले आहे. त्याच प्रमाणे बिअर शॉप वर सुरू असलेल्या बेकायदेशीर मद्य विक्री आणि मद्य प्राशन करणाऱ्यांवर कठोर पावले उचलावीत अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
Comments
Post a Comment