5837 मतदाराच्या हाती खैरपाडा ग्रामपंचायतीचा भवितव्य
5837 मतदाराच्या हाती खैरपाडा ग्रामपंचायतीचे भवितव्य
बोईसर : पालघर जिल्ह्यातील खैरपाडा ग्रामपंचायत होणाऱ्या निवडणूकीत 17 सदस्यासह थेट सरपंच पदासाठी एकूण 5837 मतदाते मतदार करणार असुन उमेदवार नेमकी कोणत्या विकासाच्या मुदद्यावर किंवा फक्त आश्वासनावर मत मांगतील व मतदाते कोणाला निवडून देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक जाहीर झाल्या आहेत यात सदस्य पदासह सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ग्रामपंचायतीला ग्रामीण विकासाचा कणा म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ग्रामीण भागाचा किंवा खेड्याचा संपूर्ण विकासाची जबाबदारी ही ग्रामपंचायतीवर असते. पंचायत राज व्यवस्थेमधील ग्रामपंचायत हा एक सर्वात महत्त्वाचा घटक असून ग्रामीण भागाच्या विकासावरच भारताचा विकास अशी संकल्पना असल्यामुळे ग्रामपंचायतीचे महत्त्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रचनेमध्ये खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहे.अश्याच खैरपाडा या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ हा पूर्ण झाला असुन यात 17 सदस्यासह थेट सरपंच पदाची निवड ही जनतेतुन होणार आहे.
ग्रामपंचायतची निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी स्थानिक स्तरावर पॅनल तयार करून या निवडणुका लढविल्या जातात त्यातच सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्यात येते. त्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर ग्रामीण भागातील राजकारण अधिकच तापलेले असून गावा गावात आता निवडणुकीसाठी चुरस वाढली आहे.
यात खैरेपाडा ग्रामपंचायतीत एकूण 6 वार्ड असून यामध्ये वार्ड क्र.1 मध्ये उमेदवार सदस्य संख्या 3 असून या मध्ये पुरुष 612 व महिला 494 असे एकूण 1110 मतदार आहे, वार्ड क्र.2 मध्ये 2 सदस्य संख्या असून पुरुष 455 व महिला 365 असे एकूण 820 मतदार आहे, वार्ड क्र.3 मध्ये 3 सदस्य संख्या असून पुरुष 590 व महिला 452 असे एकूण 1042 मतदार आहे, वार्ड क्र 4 मध्ये 3 सदस्य संख्या असून पुरुष 556 तर महिला 512 असे एकूण 1068 मतदार आहे, वार्ड क्र 5 मध्ये 3 सदस्य संख्या असून पुरुष 492 तर महिला 388 असे एकूण 880 मतदार आहे वार्ड क्र 6 मध्ये 3 सदस्य संख्या असून पुरुष 525 तर महिला 396 असे एकूण 921 मतदार आहे असे खैरेपाडा ग्रामपंचायततीत पुरुष 3230 तर महिला 2607 असुन एकूण 5837 मतदार असून मतदाते 5 नोव्हेबरला होणाऱ्या मतदानात मतदाराच्या हातात उमेदवारांचे भवितव्य असणार.
Comments
Post a Comment