सालवड गावात भंडाराचा राजा ५७ वा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
सालवड गावात भंडाराचा राजा ५७ वा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा पालघर : पालघर जिल्ह्यातील सालवड गावात मोरे भंडारी समाज गेल्या अनेक वर्षापासून गणेशोत्सव साजरा करत असुन या ५७ व्या वर्षी देखील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशभरात गणेशोत्सव साजरा केला जात असून गणेशोत्सवादरम्यान नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे गणेशोत्सव २०२३ ला उत्साहात सुरुवात झाली असुन लाडक्या बाप्पासाठी सुंदर मखर अन् फुलांची आरास करून, एकापेक्षा एक अफलातून सजावट केलेली दिसून येत यात लहानांपासून मोठ्यां पर्यंत सर्व जण उत्साहात गणरायाचं स्वागत करताना दिसत आहे फक्त घरातचं नव्हे तर मंडळाद्वारेदेखील सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना दिसून येत आहे गणरायाच्या स्वागतासाठी मंडळाचे कार्यकर्ते आणि गणेशभक्त जोरदार तयारी करतात व ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाचं आगमन आणि विसर्जन केले जाते. असाच मोरे भंडारी समाज गणेशोत्सव मंडळ सालवड गावातील सलग ५७ वर्षापासून साजरे करत असुन सातव्या दिवशी गणपती बाप्पाचे वाजत गाजत भक्तीमय वातावरणात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला या विसर्जन सोहळ्यासाठी मं...