यश फाउंडेशन तर्फे कै.यश उत्तम पिंपळे यांच्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य शिबीराचे केले आयोजन
यश फाउंडेशन तर्फे कै.यश उत्तम पिंपळे यांच्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य शिबीराचे केले आयोजन
पालघर : राजकीय व सामाजिक जीवनात नेहमीच अग्रेसर असलेले जिल्ह्यातील प्रत्येक सामाजिक चळवळीमध्ये हिरीरीने सहभाग घेणारे माजी शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख व माजी नगराध्यक्ष माननीय श्री उत्तम पिंपळे यांचे लाडके दिवंगत पुत्र कै.यश उत्तम पिंपळे यांच्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ दिनांक 11/09/2023 रोजी सकाळी साडे 9 वाजल्यापासून यश फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबीर आणि मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले आहे.
या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त सामान्य व गोरगरीब लोकांना उपयोग व्हावा , या दृष्टीने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच या आरोग्य शिबिरात धडा हॉस्पिटल पालघर येथे 1) हाडाची तपासणी 2) हाडांची घनता तपासणी 3) हातापायला मुंग्या येणे 4) विनामूल्य युरिक ऍसिड तपासणी 5) रक्तातील साखर तपासणी तसेच एम. एल. ढवळे ट्रस्ट हॉस्पिटल च्या सहकार्याने विनामूल्य डोळे तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येतील.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे मागील 12 वर्षापासून यश फाउंडेशन तर्फे सामान्य जनतेच्या सेवेसाठी ही आरोग्य शिबिरे अविरतपणे कार्यरत आहेत. ज्यामध्ये आतापर्यंत हजारो लोकांनी सहभाग घेऊन या सामाजिक कार्याची योग्य दखल घेतली आहे.
सदर आरोग्य शिबीर हे मच्छिमार सोसायटी हॉल, दर्या सारंग बिल्डिंग, माहीम रोड पालघर (प ) येथे असुन या शिबिरामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेण्यासाठी 1) प्रथमेश पिंपळे - 97665008777 2) डॉक्टर स्मिता शिंदे :- 9028355161 यांच्याशी संपर्क साधुन या उपक्रमाची माहिती आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त ग्रुप वर शेअर करावी ,जेणेकरून गरजू व्यक्तींना त्याचा लाभ घेता येईल.
Comments
Post a Comment