जनसंवाद अभियानातून मोठे गुन्हे टळले तर बरेच केसेस उघडकीस आले
जनसंवाद अभियानातून मोठे गुन्हे टळले तर बरेच केसेस उघडकीस आले
ज्या जिल्ह्यात शांतता आहे त्याच जिल्ह्यात प्रगती आहे - बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर
पालघर : पालघर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाणे यांना आय. एस. ओ. प्राप्त नामांकन सर्टिफिकेट वाटप कार्यक्रम दिनांक १३ सप्टेंबर २०२३ रोजी पालघर जिल्हा कार्यालयातील नियोजन भवनाच्या सभागृहात पालघर पोलिसांच्या जनसंवाद अभियान कार्यक्रमात मान्यवर मा.श्री.प्रविण साळुंके - अप्पर पो. महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पोलीस ठाण्यातील प्रभारी पोलीस अधिकारी यांना आपल्या कार्यरत पोलीस ठाण्याला मिळालेले आयएसओ प्राप्त मानांकन सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले.
जनसंवाद अभियान जून 2022 मध्ये सुरु झाला त्यावेळी गडचिंचले येथे साधु हत्याकांड झाले होते आणि अश्या प्रकारच्या घटने मुळे जिल्ह्याला कलंकीत करणार नाव लागल होत अश्या घटना पुन्हा घडू नये यासाठी उपाय योजना करणे आवश्यक होते. त्या घटनेत एक गोष्ट स्पष्टपणे समोर आली की त्याठिकाणी पोलीस मोठ्या संख्यने पोहचुनही विश्वास अभावी मोपवर कंट्रोल करता आल नाही तसेच त्यांना पोलीसांच्या सुचना समजल्या नाही. त्यामुळे पोलीस व जनता यामध्ये कुठलीही दरी राहु नये यासाठी एका गावात एक पोलीस ही योजना राबविली त्याचबरोबर बालविवाह रोखण्यासाठी जनजागृति , महिला सक्षमीकरण, नशामुक्ति, रस्ते सुरक्षा अभियान, सायबर गुन्हे एक्ट, अंधश्रद्धां बाबत जनजागृति, आश्रम शाळेत काही चुकीची प्रकार चालत होते त्यासाठी वारंवार जाऊन त्याठिकाणी कंप्लेंट्स बॉक्स ठेवले तर काही आश्रम शाळा पोलीसांनी दत्तक ही घेतले त्यामुळे शाळेत विविध माध्यमातुन मदत करण्यात आली, भरती पूर्व प्रशिक्षण राबविले, या जिल्ह्यातील लोककला तारपा, वारली असे नुत्य हे जगभर प्रसिद्ध आहे त्यांना व्यासपीठ निर्माण करून दिल, mpsc, upsc व पोलीस भरती विद्यार्थ्यना पुस्तके उपलब्ध करून दिली, रोजगार मेळावा आयोजित केला, पोलीस पाटलांना ब्लेजर तसेच प्रशिक्षण दिले, महिला पदाधिकाऱ्याचा मेळावा व त्यांना प्रशिक्षण दिले हे सर्व विविध उपक्रम जनसंवाद अभियानातुन राबविण्यात आले आणि हे सर्व करण्याच्या मागे एक उद्देश्य होते की पोलीस डीपार्टमेन्ट मध्ये ज्या दोन गोष्ठी करायच्या असतात गुन्हेगारीवर नियंत्रण व कायदा सुव्यवस्था राखणे त्यामुळे यासर्व बाबी मुळे जनसंवाद अभियानातून वाडा व वाणगांव येथे साधु हत्याकांड घटना टळल्या तसेच जनसंवाद अभियानातुन घरफोड़ी व चोरी च्या केसेस उघडकीस आल्या, मोठ मोठे गुन्हे या जनसंवाद अभियानामुळे टळले आणि या संपूर्ण योजनेचा अंतिम ध्येय हेच आहे की ज्या जिल्ह्यात शांतता आहे त्याच जिल्ह्यात प्रगती आहे हे सर्व करण्यासाठी आपली सर्वाची मदत आम्हाला होत आहे असे बाळासाहेब पाटील ,पोलीस अधीक्षक पालघर यांनी सांगितले.
यावेळी मान्यवर प्रविण साळुंके - अप्पर पो. महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की , बाळासाहेब पाटील - पोलीस अधीक्षक पालघर यांच्या नेतृत्वात पालघर पोलिसांनी चांगली प्रगती केली आहे, तसेच तीन वर्षांपूर्वीच्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात आणि आताच्या पोलीस ठाण्यात खूप बदल झाले असून पालघर जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या आयएसओ प्राप्त मानांकन सर्टिफिकेट मिळाले आहे. ही पालघर पोलिसांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. गडचिंचले येथे जेव्हा साधू हत्याकांड झाले, तेव्हा मी पुणे सी.आय.डी. मध्ये कार्यरत होतो. तेव्हा ही केस माझ्याकडे आली होती. त्यावेळी या गुन्ह्यातील जवळपास शंभर आरोपींना कोविडमुळे ठाण्याला किंवा तळोजा कारागृहात नेणे शक्य नव्हते. तेव्हा कोर्टाने आदेश दिले की त्यांना पोलीस ठाण्यातच ठेवा, परंतु त्यावेळेस जिल्ह्यातील पोलीस ठाण्याची परिस्थिती त्यांना ठेवण्या योग्य नव्हती. पण आता तीन वर्षांत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटीलांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील पोलीस ठाण्याला आयएसओ आणि स्मार्ट पोलीस ठाण्याचे नामांकन प्राप्त झाले आहे.
सदर आयएसओ प्राप्त नामांकन सर्टिफिकेट मिळवून देण्यात उद्योजक समीर रूपलक व त्यांची पत्नी सेजल समीर रुपलक यांचे यानी केलेल्या सहकार्य बद्दल अभिनंदन केले.
या कार्यक्रमात व्यासपीठावरील विराजमान असलेल्या मान्यवर मा.श्री.प्रविण साळुंके - अप्पर पो. महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पालघर पोलीस मित्रांना टी -शर्ट व टोपी वाटण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक पालघर, बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट, पोलीस उपअधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलीस अधिकारी (गृह ) संगीता अल्फासो , शैलेश काळे, नीता पाडवी, संजीव पिंपळे सर्व पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी व पालघर जिल्ह्यातील पोलीस पाटील व पोलीस मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment