जन्मदात्या आईनेच गळा दाबुन सहा दिवसाच्या चिमूरडीची केली हत्या
जन्मदात्या आईनेच गळा दाबुन सहा दिवसाच्या चिमूरडीची केली हत्या
बोईसर : तारापूर घिवली येथील एका निर्दयी आईने आपल्या अवघ्या सहा दिवसांच्या चिमुकल्या मुलीचा गळा दाबुन हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
तिसरी मुलगी झाली म्हणून एका निर्दयी मातेने आपल्या पाच दिवसांच्या चिमुकलीचा गळा दाबून हत्या केली. ही घटना पालघर जिल्ह्यातील तारापूर परिसरातील घिवली या गावात घडली आहे. या निर्दयी मातेने पुरावा नष्ट करण्यासाठी चिमुकलीचा मृतदेह नदीत फेकल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी तारापूर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. श्रेया प्रभू (वय ३२) असे आरोपी महिलेचे नाव आहे.
आरोपी महिलेला पहिली मुलगी आणि दुसरा मुलगा असतानाही तिला आणखी एक मुलगा हवा होता मात्र तिसऱ्यांदा तिला पुन्हा मुलगी झाली. मुलगी नको म्हणून या निर्दयी महिलेने सहा दिवसांच्या नवजात चिमुकलीचा स्वतःच्या हाताने गळा दाबून खून केला. तिचा मृतदेह प्लास्टिक पिशवीत घालून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी सकाळी एसटीने बाहेर पडली. बोईसर रेल्वे स्टेशन आणि तिथून बोईसर ते खार मुंबई येथे माहेरी गेली. माहेरी कोणीच नसल्याने तसेच मृत बाळाला फेकण्यासाठी योग्य ठिकाण न मिळाल्याने पुन्हा बोईसरला परत आली. सायंकाळच्या सुमारास तिने वानगाव परिसरातील नदीपात्रात बाळाचा मृतदेह फेकला व सासरी परतली.
गावातील आशा सेविका श्रेया प्रभू हिच्या घरी नवजात बाळाची तपासणी करण्यासाठी गेले असता, तिथे बाळ नसल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी आरोपी महिलेने त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र, महिला काल बाळाला घेऊन माहेरी मुंबईला एक महिन्यासाठी जाते म्हणून सांगून गेली. मात्र एका दिवसात परत आली. मात्र परत येताना तिच्याकडे बाळ नव्हते. अशी माहिती शेजाऱ्यांकडून समजल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी याबाबत तारापूर पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी या महिलेची कसून चौकशी केली असता तिने मुलीच्या हत्येची कबुली दिली.
Comments
Post a Comment