अन्न व औषध प्रशासनाकडून गुटख्यावर मोठी कारवाई : ९४ लाखांचा गुटखा जप्त
अन्न व औषध प्रशासनाकडून गुटख्यावर मोठी कारवाई : ९४ लाखांचा गुटखा जप्त
पालघर : दिनांक 9/09/2023 रोजी दुपारी मिळालेल्या गुप्त वार्ता कडून अन्न व औषध प्रशासनच्या पालघर व मुंबई यांच्या सयुंक्त कारवाईत राजस्थानातील जयपुर वरून भरून निघालेला तंबाखूजन्य पदार्थ राजनिवास गुटख्याने भरलेला पुणा बंगलौर रोडवेज ट्रान्सपोर्ट ची दहा चाकी वाहन कंटेनर नं HR. 55 AB 5055 हा गुजरातच्या दिशेने येत असताना विजिलियन्स टीम ने पाठलाग सुरु असताना त्याला चकवा देत मुंबई च्या दिशेने जाणारा कंटेनर पुन्हा एकदा मनोर चिल्हार उड्डान पुलाच्या खालून गुजरात च्या दिशेने जात असताना विजीलियन्स टीम व पालघर पोलीसांनकडून प्रतिबंधित गुटखा कंटेनर सह ताब्यात घेण्यात आला आहे सदर कंटेनर पकडून मनोर पोलीस ठाण्यात आणले असता सदर गाडीत 168 गुटख्याच्या गोण्या असुन ९४ लाखांचा प्रतिबंधीत गुटखा व १७ लाख रुपये किंमतीचा टेलरसह कंटेनर हस्तगत करण्यात आला असुन पुढील तपास चालू आहे.
Comments
Post a Comment