रिपब्लिकन पक्ष मजबूत करणे म्हणजे सर्व सामान्याना न्याय देणे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
रिपब्लिकन पक्ष मजबूत करणे म्हणजे सर्व सामान्याना न्याय देणे - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
बोईसर : दिनांक 4/09/2023 रोजी बोईसर येथील टिमा हॉल येथे पालघर जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे स्वागत करण्यात आले.
रिपब्लिकन पक्ष हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा पक्ष आहे आणि तो चालवण्याचा आम्ही प्रयन्त करत आहोत. दलित ,आदिवासी ,ओबीसी मराठा, मुस्लिम , लिंगायत , ख्रिश्चन सर्व जाती धर्मियांना सोबत घेऊन रिपब्लिकन पक्ष मजबूत करा तसेच मच्छिमार समाजाचा कोळी बांधवांचा मासेमारीचा परंपरागत व्यवसाय अडचणीत येणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी. एखादा चांगला प्रकल्प राज्यात येत असेल तर दोन्ही बाजूंनी विचार करून मार्ग काढला पाहिजे अशी वाढवण बंदर बाबत ना.रामदास आठवले यांनी भूमिका मांडली. पालघर मध्ये उद्योग प्रकल्प येत आहेत. त्यात स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य द्यावे. पालघर जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. जव्हार मोखाडा येथे अद्याप अनेक प्रश्न आहेत. रस्त्यांचा उद्योगाचा शेतमालाला चांगला भाव देण्याचा प्रश्न आहे. या प्रश्नांवर रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी काम करून आदिवासी बांधवांना सोबत घ्यावे.
तसेच तारापुर एमआयडीसी ही आशियातील सर्वात मोठी एमआयडीसी असुन येथे कंपनी बरोबर प्रदुषण ही जास्त आहे आणि येथील कारखानदार प्रदुषण कमी करण्याचा प्रयन्त ही करत नाही त्यामुळे यांचा त्रास येथील लोकांना होत असुन प्रदुषणामुळे येथील लोकांनचे आयुष्य हे 10 ते 15 वर्ष कमी झाले आहे.त्यामुळे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या आरोगाच्या समस्यांबाबत आठवले यांनी चिंता व्यक्त केली आहे
आणि पालघर नवीन जिल्हा निर्माण झाला आहे.मात्र अद्याप येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन निर्माण झाले नाही. त्यासाठी जमीन देण्याची शासनाने घोषणा केली आहे.मात्र अद्याप डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन निर्माण झाले नाही. जिल्ह्यातील जनतेची मागणी आहे या मागणीसाठी आपण लवकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ असे आश्वासन ना.रामदास आठवले यांनी दिले. पालघर मध्ये सुपर स्पेशॅलीटी हॉस्पिटल उभारले पाहिजे या मागणीसह विविध प्रश्न सोडविण्याकडे आपण लक्ष देऊ असे आश्वासन ना.रामदास आठवले यांनी दिले.
त्यानंतर विरोधकांना टोला लावताना म्हणाले की आम्ही 9 वर्षापासून सत्तेमध्ये आहोत आणि आमच्या कुठल्याही एका मंत्रीवर भ्रष्टाचाराचा गालबोट लागेल अस आरोप नाही आणि आम्ही काम करणारे लोक आहेत त्यामुळे आता सर्व लोक इंडियाच्या नावाने एकत्र आले आहेत तुम्हाला निवडणुक लढण्याचा अधिकार आहे. तुम्हाला जे करायच ते करा तुम्ही प्रयन्त करा आम्ही प्रयन्त करू जनता कोणाच्या पाठीशी आहे हे 2024 मध्ये सिद्ध होणार आहे आणि 2024 मध्ये तीसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील अश्या पद्धतिच्या प्रकारचा सर्व जगातला अनेक एक्सपर्ट असलेल्या न्यूज़ पेपर व चैनलचा रिपोर्ट आहे तुम्ही आम्हाला हरवण्याचा प्रयन्त करता आम्ही तुम्हाला हरवणार नाही तुम्ही स्वत:च हरणार आहे आणि सर्व जण नरेंद्र मोदीला हरवण्यासाठी एकत्र येतात तुमचा अजंडा देशाच्या विकासासाठी नाही असे बोलून विरोधकांना टोला लगावला आहे.
शिबिरात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ऐकवली कविता
रिपब्लिकन पक्ष हा आहे बाबासाहेबाचा पक्ष, म्हणूनच आहे देशाचाही त्याकडे लक्ष, दलित, बहुजन, आदिवासी, गोरगरीबांच्या कामामध्ये मी नेहमीच असतो दक्ष, कारण मला मजबूत करायचा आहे माझ्या भीमाचा पक्ष
यावेळी विचारमंचावर कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील,रिपाइंचे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, रिपाइंचे राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य आणि पालघरचे निरीक्षक सुरेश बारशिंग, ठाणे प्रदेश अध्यक्ष बाळाराम गायकवाड, प्रदेश सरचिटणीस श्याम शेवाळे,पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव,शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख (शिंदे गट) कुंदन संखे, युवक आघाडी जिल्हा अध्यक्ष सचिन लोखंडे, माजी सरपंच लक्ष्मीबाई चांदणे, नरेंद्र करनकाळे, रोहिणी गायकवाड,आशाताई दहाट,आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment