भारतीय जनता पार्टी च्या पासमंदा मंच च्या पालघर जिल्हा अध्यक्ष पदी पत्रकार इल्यास पठाण यांची नियुक्ति
भारतीय जनता पार्टी च्या पासमंदा मंच च्या पालघर जिल्हा अध्यक्ष पदी पत्रकार इल्यास पठाण यांची नियुक्ति
पालघर : भारतीय जनता पार्टी च्या पासमंदा मंच च्या पालघर जिल्हा अध्यक्ष पदी समाजसेवक व वरिष्ठ पत्रकार इल्यास पठाण यांची नियुक्ति करण्यात आली आहे.
इल्यास पठाण हे एक समाजसेवक व खबरदार न्यूज़ चे संपादक असुन त्यांनी आपल्या कार्याने समाजसेवा करुन व पत्रकारीता द्वारे समाजात चांगला ठसा उमटवला आहे व त्याद्वारे नेहमीच उल्लेखनीय कामगिरी करून आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्याअनुषंगाने भारतीय जनता पार्टी च्या पासमंदा मंच ची इल्यास पठाण यांना मोठी जबाबदारी देऊन पालघर जिल्ह्यात पक्ष व मंचाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करण्यासाठी तसेच पक्ष व मंच मजबूत करण्यासाठी सर्व शक्ति निशि योगदान देतील तसेच समाजातील सर्व घटकाना सोबत घेऊन पक्ष व मंचाची ध्येय धोरणे तसेच विचार सर्वदूर पोहचविण्यासाठी प्रयन्तशील राहतील या हेतूने भारतीय जनता पार्टी च्या पासमंदा मंच च्या पालघर जिल्हा अध्यक्ष पदी इल्यास पठाण यांची नियुक्ति भारतीय जनता पार्टी पासमंदा मंच चे महाराष्ट्र अध्यक्ष सलमान खान यांनी केली आहे.
यावेळी इल्यास पठाण यांनी नियुक्तिचे श्रेय भारतीय जनता पार्टी पासमंदा मंच चे महाराष्ट्र अध्यक्ष सलमान खान व जिल्हा मंत्री इनामुलहक (पप्पू भाई ) यांना देऊन त्यांनी एवढी मोठी जबाबदारी देऊन विश्वास दाखविल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
Comments
Post a Comment