स्थानिक गुन्हे शाखेनी अवैधरित्या तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करण्याऱ्या आरोपीला केले अटक दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी पोलीस निरीक्षक अनिल विभुते स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना मिळालेल्या गोपनीय बातमीदाराकडून मौजे कुडूस प्रगतीनगर डी-3 बिल्डिंगच्या दोन गाळ्यात तंबाखुजन्य पदार्थ विक्रीसाठी बाळगत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. सदर माहिती प्राप्त होताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून छापा टाकून आरोपी ईदरिस यूनुसभाई काचलिया वय 24 वर्ष याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचेकडून 12,17,770/- रूपये कीमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी आरोपीस अटक करून त्यांचेविरुद्ध वाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि क्र 411/203 भा.द.वि.सं क 328, 188, 272, 273 सह अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 नियम व नियमने 2011 चे कलम 26(2), 27, 23,26(2), (4), 30(2)(अ), सहवाचन मा. अन्न सुरक्षा आयुक्त महाराष्ट्र राज्य अधिसुचना अ.सु.म.अ./अधिसूचना 794/2018/7 दिनांक 20/07/2018 व अधिसुचना क्र. अ. सु. मा. का./अधिसुचना 795/2018 दि.20/07/2018 रेग्युलेशन 20,2,3,4, ऑफ फूड सेफ्टी एंड स्टैंडउ 3,1,7,2011 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल सावंतदेसाई, नेम स्थानिक गुन्हे शाखा, पालघर हे करीत आहेत. सदरची कामगिरी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर, पंकज शिरसाठ, अप्पर पोलीस अधीक्षक पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल विभुते स्थानिक गुन्हे शाखा पालघर, पोउपनि - स्वप्निल सावंतदेसाई, पोहवा - राकेश पाटील, कैलाश पाटील, नेमाडे, सरदार, पोना - नरेश घाटाळ, पोशि - मयूर बागल सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी यशस्विरित्या पार पाडली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेनी अवैधरित्या तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करण्याऱ्या आरोपीला केले अटक
पालघर : दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी पोलीस निरीक्षक अनिल विभुते स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना मिळालेल्या गोपनीय बातमीदाराकडून मौजे कुडूस प्रगतीनगर डी-3 बिल्डिंगच्या दोन गाळ्यात तंबाखुजन्य पदार्थ विक्रीसाठी बाळगत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली.
सदर माहिती प्राप्त होताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करून छापा टाकून आरोपी ईदरिस यूनुसभाई काचलिया वय 24 वर्ष याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचेकडून 12,17,770/- रूपये कीमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी आरोपीस अटक करून त्यांचेविरुद्ध वाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि क्र 411/203 भा.द.वि.सं क 328, 188, 272, 273 सह अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 नियम व नियमने 2011 चे कलम 26(2), 27, 23,26(2), (4), 30(2)(अ), सहवाचन मा. अन्न सुरक्षा आयुक्त महाराष्ट्र राज्य अधिसुचना अ.सु.म.अ./अधिसूचना 794/2018/7 दिनांक 20/07/2018 व अधिसुचना क्र. अ. सु. मा. का./अधिसुचना 795/2018 दि.20/07/2018 रेग्युलेशन 20,2,3,4, ऑफ फूड सेफ्टी एंड स्टैंडउ 3,1,7,2011 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल सावंतदेसाई, नेम स्थानिक गुन्हे शाखा, पालघर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर, पंकज शिरसाठ, अप्पर पोलीस अधीक्षक पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल विभुते स्थानिक गुन्हे शाखा पालघर, पोउपनि - स्वप्निल सावंतदेसाई, पोहवा - राकेश पाटील, कैलाश पाटील, नेमाडे, सरदार, पोना - नरेश घाटाळ, पोशि - मयूर बागल सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी यशस्विरित्या पार पाडली आहे.
Comments
Post a Comment