कासा पोलीसांनी पकडला 19 लाख 48 हजाराचा गुटखा : एकाला अटक
कासा पोलीसांनी पकडला 19 लाख 48 हजाराचा गुटखा : एकाला अटक
पालघर : आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या पाश्वभुमीवर बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या.
त्याअनुषंगाने दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी कासा पोलीस ठाणे हद्दीत आंबोली बिट भागात पो.ना -प्रमोद धुम, पो.हवा-धांगडा, पो.ना - लाडवी हे प्रेट्रोलिंग करत असताना हळदपाडा गावाच्या हद्दीत संशयीत आयसर टेम्पो क्र. एमएच-48 सी.बी 5708 हा आढळून आला सदर टेम्पो थांबवुन पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र अधिसुचनाद्वारे वाहतुकीस व विक्रीस प्रतिबंध केलेला पान मसाला (गुटखा) टेम्पोतुन विक्री करण्यासाठी बेकायदेशीरपणे वाहतुक करुन घेऊन जात असताना मिळून आला आहे. यात हॉट पान मसाला, एच टू के तंबाखु, सनकी पान मसाला व पान मसाला जो मानवी जीवितास अपायकारक असे 15,064 पॉकेट असुन 19,48,800/- रूपये किमतीचा गुटखा व लाल रंगाचा आयसर टेम्पो 7 लाख रूपये असा एकूण 26,48,800/- रूपये किमतीचा मुद्देमाल कारवाई मध्ये जप्त करण्यात आला आहे.
याबाबत कासा पोलीसांनी टेम्पोचालक आरोपी सुशील सिताराम साहनी वय 35 वर्ष रा. मांडवीपाडा साईधाम चाळ काशिमीरा, मीरारोड (मुळ-बिहार ) यास अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोउपनि संदीप नांगरे, नेमणुक कासा पोलीस ठाणे हे करीत आहे.
सदरची कामगिरी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर, पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक पालघर, शैलेश काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली नामदेव बंडगर, प्रभारी अधिकारी, कासा पोलीस ठाणे, पोउपनि- संदीप नागरे, पोना -प्रमोद महादु धुम, पोहवा - धांगडा, पोना - लाडवी सर्व नेमणुक कासा पोलीस ठाणे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे.
Comments
Post a Comment