मराठा समाजाला ओ.बी.सी प्रवर्गातुन आरक्षण देण्यासाठी काढण्यात आलेला जी.आर. त्वरित रद्द करा - कुणबी सेनेचे महाराष्ट्र प्रमुख विश्वनाथ पाटील

मराठा समाजाला ओ.बी.सी प्रवर्गातुन आरक्षण देण्यासाठी काढण्यात आलेला जी.आर. त्वरित रद्द करा - कुणबी सेनेचे महाराष्ट्र प्रमुख विश्वनाथ पाटील 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण १३व्या दिवशीही सुरु असुन त्यानी पाणी आणि औषध त्यागण्याचा इशारा दिला होता. मात्र मनोज जरांगे पाटलांचं सुरु असलेलं आंदोलन बेकायदेशीर असून त्यांना अटक करण्याची मागणी कुणबी सेनेचे महाराष्ट्र प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे.

विश्वनाथ पाटील यांनी पत्रात म्हटलं की, मराठा महासंघाच्या वतीने राज्यात हिंसक आंदोलन सुरु आहे. यापूर्वी मराठा समाजाला दिलेले आंदोलन सर्वोच्च न्यायालयाने घटनेच्या चौकटीत बसत नाही म्हणून रद्द केलं आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यास कुणबी समाजाचा विरोध नाही; ही भूमिका आम्ही वेळोवेळी स्पष्ट केली आहे. मात्र मराठा समजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास ओबीसीमध्ये असलेल्या ३७० च्यावर जातींवर हा अन्याय असेल, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील सरकारवर दबाव टाकून राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण करत आहेत. त्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करावी. त्यांना उपोषणावरुन उठवावे. त्यांच्या सनदशीर आणि लोकशाही मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाला आमचा विरोध नाही. मात्र त्यांच्याजवळ कोणताही दस्तावेज नसताना वंशावळीची अट रद्द करण्याची त्यांची मागणी भारतीय राज्यघटनेची पायमल्ली करणारी आहे, असंही विश्वनाथ पाटील यांनी म्हटलं. 

मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने समिती नेमलेली असताना घाईने जीआर काढणे ही ओबीसी आणि कुणबी समाजावर अन्याय करणारी कृती आहे. शासन मनोज जरांगे यांचं उपोषण सदनशीर मार्गाने उठवण्याचा प्रयत्न करत असताना जरांगे आडमुठेपणाची भूमिका घेत आहेत.पोलीस कारवाई करुन महाराष्ट्रात निर्माण झालेला तणाव दूर करण्याची आम्ही विनंती करत असल्याचंही कुणबी सेनेचे महाराष्ट्र प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी म्हटलं.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी