पालघर तालुक्यातील मासवण गावात बंद घरात चोरी

पालघर तालुक्यातील मासवण गावात बंद घरात चोरी


पालघर : मासवण गावात एका बंद घराचा कुलप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, चांदीचे नाणे, तांदूळ, गॅस सिलिंडर व शेगडी, इन्व्हर्टर मशीन बॅटरी व रोख रकमेसह असा सुमारे ५८ हजार ७५० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना दि.३१ ऑगस्ट ते दि.०७ सप्टेंबर दरम्यान घडली.

मयूर बळवंत पिंपळे हे जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन शाखा अभियंता पालघर येथे कार्यरत असून सध्या त्यांचे वास्तव्य पालघर येथे आहे. बोईसर पूर्वेकडील मासवण - नागझरी मार्गावरील मासवण गावात त्यांचे घर असुन त्या घरात त्यांची आई भावना पिंपळे या एकट्या राहत असून त्याची तब्येत बरी नसल्यामुळे त्या दि.३१ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांचा लहान मुलगा मनीष पिंपळे यांच्याकडे पालघर नवली येथे राहण्यासाठी गेल्या होत्या व त्यानंतर त्यांची तब्येत बरी झाल्यावर त्यांचा मोठा मुलगा मयूर पिंपळे आपल्या आईला सोडण्यासाठी गुरुवार दि.०७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी मनोर मासवण येथे असलेल्या आपल्या घरी गेले असताना त्यांच्या बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने, चांदीचे नाणे, तांदूळ, गॅस सिलिंडर व शेगडी, इन्व्हर्टर मशीन बॅटरी आणि ३६ हजार रोख रक्कम असा एकूण ५८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोराने लंपास करून फरार झाले होते याबाबत मनोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

सदर घटनास्थळी पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी यांनी भेट दिली असून मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनोर पोलीस फरार आरोपी चोराचा कसून शोध घेत आहेत.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी