लोकनेते गणेश नाईक यांच्या वाढदिवसा निमित्त बोईसर मध्ये रक्तदान शिबीर

लोकनेते गणेश नाईक यांच्या वाढदिवसा निमित्त बोईसर मध्ये रक्तदान शिबीर

बोईसर : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संजय ज. पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉन बॉस्को शाळा बोईसर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

रक्तदान हे श्रेष्ठदान’ आहे  हे ब्रीदवाक्य ऊराशी बाळगून आपण प्रत्येकांनी सामाजिक बांधिलकी या नात्याने कुटुंबात, समाजात व गावागावात पोहोचवावे तसेच रक्ताचा तुटवडा भासू नये आणि गरजेच्या वेळेस मागेल त्याला रक्त उपलब्ध व्हावे तसेच वाढदिवसाला उत्सवी स्वरूप न देता रक्तदाना सारख्या पवित्र कार्यामधून शिवशक्ती सामाजिक संघटना, श्रमिक सेना कामगार संघटना आणि पालघर ऑटो रिक्षा टॅक्सी चालक व मालक संघटने ने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

मागील 28 वर्षापासून सलग बोईसरला रक्तदान शिबिराचे आयोजन करुन आतापर्यंत  6000 रक्त पिशव्या संकलित  करण्यात आल्या असून यावर्षी 145 रक्त दात्यांनी रक्तदान करुन उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे.

यावेळी रक्तदान शिबिरात  आमदार राजेश पाटील, जि.प उपाध्यक्ष पंकज कोरे, पालघर गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंदकर, माजी कृषी सभापती अशोक वडे, पालघर पंचायत समिति उपसभापती मिलिंद वडे, जि.प सदस्य महेंद्र भोणे, डिमोलो सर, कोकण पाटबंधारे माजी उपाध्यक्ष जगदीश धोडी, शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख वरिष्ठ शिवसैनिक प्रभाकर राऊळ, माजी प्राध्यापक संजय घरत, निवृत्त पोलीस उपविभागीय अधिकारी के.एस.हेगाजे, औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक व अनेक कार्यकर्ते व पत्रकार बांधव इत्यादी मान्यवर उपस्थितीत राहून संजय पाटील राबवित  असलेल्या या उपक्रमाचे  सर्वांनी कौतुक केले.

तसेच रक्त दान शिबीर यशस्वी करण्यासाठी अतुल देसाई , रुपेश संखे ऊर्फ बाली, श्याम संखे, उल्हास पाद्ये, नापेश संखे, दशरथ सुतार, यतीन मोरे, सचिन पिंपळे, रोहित पाटील, गणेश पऱ्हाड, अशोक बाबर, राजू कुरेशी, राजाराम पवार, रितेश भोणे, सोमनाथ टपले, दिपेश देसाई, सोमनाथ खानझोडे, इब्राहिम खान,जयप्रकाश चूरी, प्रदीप लोढा, आबा आदींनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी