दिक्षांत समारंभ 2023 कार्यक्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाणगांव येथे झाला संपन्न
दिक्षांत समारंभ 2023 कार्यक्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वाणगांव येथे झाला संपन्न.
पालघर : दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाणगांव, जिल्हा- पालघर येथे दिनांक दीक्षांत समारंभ (पदवीदान समारंभ) पार पडला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीयुत अजित राणे एच आर मॅनेजर कोकियो कॅमलिन यांनी केले. या कार्यक्रमाकरिता श्रीयुत महेशकुमार दयानंद सिडाम जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी, पालघर व श्रीमती दिपाली सामंत सेवानिवृत्त प्राचार्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्रभारी प्राचार्य चंदन बंजारा हे असुन कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीयुत प्रशांत बोकंद यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती जाधव मॅडम आणि आचवले मॅडम यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती सुप्रिया चुरी मँडम यांनी केले असुन आभार प्रदर्शन संजय भोई प्राचार्य यांनी केले.
या कार्यक्रमात व्यवसायातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त प्रशिक्षणार्थ्यांचे सत्कार करण्यात आला. तसेच वीजतंत्री व्यवसायातील प्रतीक जाधव व शुभम राठोड या प्रशिक्षणार्थ्यांचा जर्मनी करिता निवड झाली असुन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी श्रीमती दिपाली सामंत मॅडम यांनी ११,१११/- रुपयाची देणगी संस्थेच्या सुशोभिकरण करण्याकरीता देण्यात आली.
Comments
Post a Comment