पालघर जिल्हा परिषद येथे राजे उमाजी नाईक यांची केली जयंती साजरी
पालघर जिल्हा परिषद येथे राजे उमाजी नाईक जयंती साजरी
पालघर : पालघर जिल्हा परिषद येथे राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे आणि प्रकलप संचालक अविनाश सणस यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.
उमाजी नाईक (जन्म : ७ सप्टेंबर १७९१ मृत्यू : ३ फेब्रुवारी १८३४) हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्यात आली नाही. सन १८५७ च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारे व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरला गेला. ते म्हणजे 'उमाजी नाईक'. अशा महापुरुषाची जयंती आज साजरी करण्यात आली.
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.हसनाळकर यांनी राजे उमाजी नाईक यांच्या बद्दल उपस्थितांना माहिती दिली. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संगिता भागवत, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळुंखे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment