बोईसर शहर समन्वयक पदी पत्रकार निनाद घरत तर युवा सेना बोईसर शहर समन्वयक पदी रोहन वडे यांची नियुक्ती
बोईसर शहर समन्वयक पदी पत्रकार निनाद घरत तर युवा सेना बोईसर शहर समन्वयक पदी रोहन वडे यांची नियुक्ती
बोईसर : साप्ताहिक पालघर जनहितचे संपादक व पत्रकार निनाद दत्तात्रय घरत यांची शिवसेना (शिंदे गट) - बोईसर शहर समन्वयक या पदी तर युवा सेना बोईसर शहर समन्वयक पदी रोहन प्रकाश वडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मागील अनेक वर्षापासून पालघर जिल्ह्यात माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करताना निनाद घरत यांनी आपल्या कार्याने या क्षेत्रामध्ये चांगला ठसा उमटवला आणि नंतर ही यशस्वी वाटचाल पूर्ण केल्यानंतर पत्रकारिता क्षेत्रात पदार्पण करुन तेथेही उल्लेखनीय कामगिरी करून आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे .त्यानंतर मागील वर्षी त्यांनी पास्थळ विभागांमध्ये शिवसेना -शिंदे गटाची स्थापना केली व त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत पास्थळमध्ये भाजपा- शिवसेना - मनसे युतीचे 4 सदस्य निवडून आले.
अश्या अभ्यासपूर्ण राजकीय विश्लेषण, वकृत्व शैली व त्यांच्यातील नेतृत्व करण्याची क्षमता ओळखून स्थानिक पातळीवर संघटनात्मक बांधणीसाठी व पक्ष वाढीसाठी कसोशीने प्रयत्न करून संघटना बळकट करतील या हेतूने बोईसर शहर समन्वयक या पदावर निनाद दत्तात्रय घरत यांची नेमणूक करुन त्यांना महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली गेली आहे.
तसेच मागील अनेक वर्षापासून बोईसर शहर व पालघर जिल्ह्यात अनेक सामाजिक कार्यात हिरी हिरी ने भाग घेऊन कोणतेही स्वतःचे स्वार्थ न बघता काम करत राहणारे आणि वैद्यकीय सहायता कक्षा मधून त्यांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष बोईसर शहर प्रमुख ह्या पदाची जबाबदारी दिल्यानंतर त्याने अनेक गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत कक्षा मधील योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. आणि त्यांची कामाबद्दल तळमळ बघता शिवसेना पक्षाने रोहन वडे यांनी सुरू ठेवलेले अविरत कार्य लक्षात घेता संघटनात्मक बांधणीसाठी, पक्ष वाढीसाठी व स्थानिक पातळीवर संघटना बळकट करण्यासाठी रोहन प्रकाश वडे यांना युवा सेना बोईसर शहर समन्वयक अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
सदर कार्यक्रमात बोईसर विधानसभा क्षेत्रातील शिवसेना पक्षातील पदाधिकाऱ्यांना शिवसेना व युवा सेनेची विधी तज्ञ , बोईसर उपशहर प्रमुख, शहर समन्वयक अधिकारी, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उप-शाखा प्रमुख अशी अनेक पदे जिल्हाप्रमुख वसंत दादा चव्हाण, उपजिल्हाप्रमुख निलम संखे, शहर प्रमुख मुकेश पाटील यांच्या हस्ते देण्यात आली. या पदग्रहण कार्यक्रमाप्रसंगी अनेक आजी-माजी शिवसेनेचे पदाधिकारी , कार्यकर्ते, शिवसैनिक व युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment