यशवंतश्रृष्टीतून सरावलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मातीभराव !
यशवंतश्रृष्टीतून सरावलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मातीभराव !
उपअभियंता मुकेश लांजेवार यांनी तात्काळ दखल घेत करुन घेतली साफसफाई
बोईसर: गणपती उत्सवात तारापूर औद्योगिक क्षेत्रातील काही कारखानदारांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तर कधीकधी मोठ्या अपघातांना देखील सामोरे जावे लागत आहे.
राज राजेंद्र इंडस्ट्रीज प्लॉट नं. जे. 173 या कारखान्याचा बांधकाम हे अधिकारी प्रोजेक्ट कंपनीकडून सुरू असून या कंपनीला कुणाचाही धाक नसल्यामुळे बोईसर येथील सुप्रसिध्द असलेल्या यशवंतश्रृष्टीतून सरावलीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर राज राजेंद्र इंडस्ट्रीज कंपनीतील माती काढून जेसीबी ने उचलून ट्रक च्या सहाय्याने डी डेकोर प्लॉट नं. जे. 260/1 च्या बाजूच्या रिकामी जागेवर टाकण्याच काम चालु होते ही माती ट्रकच्या सहाय्याने घेऊन जात असताना मुख्य रस्त्यावर पडून चीखल होऊन मातीभराव पसरलेला असल्यामुळे ऐन गणेशोत्सवात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना चिखलातुन जाव लागत होते यात बाईक घसरुन अपघात होण्याची शक्यता होती.
दरम्यान या प्रकरणाची तक्रार औद्योगिक विकास महामंडळाचे उपअभियंता मुकेश लांजेवार यांना फोनद्वारे कळविले असता त्यांनी तात्काळ दखल घेत सर्व कामे बंद करून जेसीबीच्या सहाय्याने आजु बाजुच्या माती चा भराव काढून रस्त्यावर साफसफाईचे काम करण्यात आले त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना होणारा त्रास आता दूर झाला आहे.
Comments
Post a Comment